न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST2021-03-08T04:33:23+5:302021-03-08T04:33:23+5:30

सर्वोच्च न्यायालयाचा निकालानुसार जिल्ह्यातील १५ ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आहे. यात मालपूर येथील माजी सरपंच ...

Political discussions resumed after the court decision | न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय चर्चा सुरू

न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय चर्चा सुरू

सर्वोच्च न्यायालयाचा निकालानुसार जिल्ह्यातील १५ ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आहे. यात मालपूर येथील माजी सरपंच हेमराज पाटील यांच्या धर्मपत्नी चंद्रकला हेमराज पाटील यांचादेखील समावेश आहे. निवडणूक लागल्यास तालुक्यातील बेटावद, नरडाणा, खलाणे व मालपूर गटात नवीन सामना रंगणार. काही हौशी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आतापासूनच कोणा-कोणात सामना रंगणार याची नावेच जाहीर करून टाकली. मालपूर जिल्हा परिषद गटात निमगूळ व मालपूर असे दोन गण असून निमगूळ गणात निमगूळसह रामी, धावडे, पथारे, झिरवे तर मालपूर गणात मालपूरसह सुराय, चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे आदी गावांचा समावेश असून ही गावे मालपूर जिल्हा परिषद गटात समाविष्ट आहेत.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करते. न्यायालयाच्या निर्णयानुसार सदस्यत्व रद्द होत असेल तर यात माझी काय चूक आहे. या विरोधात दाद मागणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या सल्लानुसार यापुढे निर्णय घेणार.

चंद्रकला हेमराज पाटील.

सदस्या,जि.प.गट,मालपूर

Web Title: Political discussions resumed after the court decision