शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला झाली धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:13 IST

पेटले गावातील घटना : १७ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल

धुळे : एका जणास मारहाण करत असताना त्यास सोडविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना साक्री तालुक्यातील पेटले गावातील पाण्याच्या टाकीजवळ घडली़ याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात १७ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वामन मंगल्या चौधरी यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, साक्री तालुक्यातील पेटले गावातील पाण्याच्या टाकीजवळ रामभाऊ राजू पवार (ता़ जामदा ता़ साक्री) याला शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका जमावाकडून मारहाण केली जात होती़ घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी हा वाद मिटविण्याचा आणि पवार याला जमावाकडून सोडविण्याचा प्रयत्न केला़ याचा राग येऊन उलट जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण केला़ शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली़ या घटनेमुळे पेटले गावात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ या घटनेनंतर रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी वामन मंगल्या चौधरी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानुसार, विजू गरमक राठोड, गोरख भाईदास राठोड, बढीराम कुका राठोड, मेरचन कुका राठोड, भैय्या चेतराम पाटील, वजू सुका राठोड, इंदल गरकम राठोड आणि अन्य अनोळखी ८ ते १० इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली़ त्यांच्या विरोधात भादंवि कलम ३५३, १४३, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत़ पेटले गावात सध्या तणावाचे वातावरण आहे़दरम्यान, पोलिसांवर हात उगारण्याची घटना घडल्याने आता हे प्रकरण गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़  

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी