गृहमंत्र्यांच्या पुतळा दहनापुर्वी पोलिसांनी ताब्यात घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST2021-03-22T04:32:54+5:302021-03-22T04:32:54+5:30

शहरातील राजवाडे बॅकेसमोर रविवारी गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजपकडून दहन करण्यात आले. पुतळा दहनापुर्वीच पोलिस घटनास्थळी पोहचल्याने पोलिसांनी पदाधिकाऱ्यांकडून गृहराज्य ...

Police seized the statue of the Home Minister before burning it | गृहमंत्र्यांच्या पुतळा दहनापुर्वी पोलिसांनी ताब्यात घेतला

गृहमंत्र्यांच्या पुतळा दहनापुर्वी पोलिसांनी ताब्यात घेतला

शहरातील राजवाडे बॅकेसमोर रविवारी गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजपकडून दहन करण्यात आले. पुतळा दहनापुर्वीच पोलिस घटनास्थळी पोहचल्याने पोलिसांनी पदाधिकाऱ्यांकडून गृहराज्य मंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल म्हणाले की, आघाडी सरकारमधील मंत्र्यावर रोज एक नवीन आरोपांची मालिका समाेर येत आहे. धनजंय मुंडे, संजय राठोड त्यानंतर गृहराज्य मंत्री अनिल देेेेशमुख अशा दिग्गज नेत्यांवर होणारे आरोपाविषयी अधिकारी वर्ग खुलेआम बोलत आहेत.

गृह मंत्र्यावरील आरोप सर्वात मोठा व गंभीर आरोप आहे. यातून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. अशा सर्व प्रकारामुळे राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता लवकरच बरखास्त होण्याच्या मार्गावर असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी म्हटले आहे.

यावेळी महापाैर चंद्रकांत सोनार, उपमहापाैर कल्याणी अपंळकर, सभापती संजय जाधव, महिला बालकल्याण सभापती वंदना जाधव, यशवंत येवलेकर, चंद्रकांत गुजराथी, ओम खंडेलवाल, संजय पाटील, नरेश चाौधरी, युवराज पाटील, विजय पाच्छापुरकर, यश कदमबांडे, रोहीम चांदोडे, सुबोध पाटील, मनोज शिरोडे, अनिल थोरात, चेतन मंडारे, अमोल धामणे, अजय अग्रवाल, राजेश पवार, मयुर सुर्यवंशी, जयश्री आहिरराव, मोनिका शिंपी, प्रतिभा चाैधरी, सागर कोडगीर, दगडू भिल, किशोर जाधव, प्रदिप कर्पे, हिरामन गवळी, कुणाल जाधव, बबन चाैधरी, नागसेन बोरसे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Police seized the statue of the Home Minister before burning it