शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 20:15 IST

तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद, गुन्हा दाखल

धुळे/पिंपळनेर - पिंपळनेर ते सटाणा रस्त्यावर एका हॉटेल शेजारी असलेले एटीएम मशिन चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला़ पण, त्यांचा हा प्रयत्न फसला असलातरी मशिनचे मात्र नुकसान झाले आहे़ हा प्रकार शनिवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास घडला़ याची नोंद सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली़साक्री तालुक्यातील पिंपळनेर ते सटाणा रोडवर असलेल्या विजयानंद हॉटेलच्या बाजूला इंडिया वन नावाचे एटीएम केंद्र आहे़ परिसरातील नागरीकांना या एटीएमचा फायदा होतो़ शनिवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास चोरटा या ठिकाणी मशिन फोडून पैसे घेण्याच्या उद्देशाने आला़ पण, मशिन फोडण्यात तो अपयशी ठरला़ त्यानंतर त्याने एटीएम मशिनचे मॉनिटर, डायल पॅड, विड्रॉल बॉक्स, पैसे भरणा करण्याचा वॉल्टचा दरवाजा तसेच सेटिंग वायर तोडून नुकसान केले आहे. ही घटना सकाळी उजेडात आली़ या एटीएम केंद्रात आणि बाहेरच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले असल्याने या घटनेत सीसीटीव्हीत तीन चोरटे दिसत आहेत़ त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला दिसून आले़ एटीएम तोडण्याचे साहित्य त्यांच्या हातात असल्याचे त्यांच्या हातात दिसत आहे़ हे तीनही चोरटे घटनेनंतर पळून गेले आहेत़ गुन्हा दाखल झाल्याने पिंपळनेर पोलीस त्यांच्या मागावर आहेत़पिंपळनेर येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका व्यक्तीला आवाज ऐकू आला़ त्याला काहीतरी होत असल्याचा संशय आल्याने त्याने पिंपळनेर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीला पाहताच चोरट्यांनी एटीएम केंद्रावरुन पळ काढला़ इंडिया वन एटीएमचे विरल सुरेशभाई कुवाडिया (रा.नंदुरबार) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण अमृतकर करीत आहेत.