शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मेथी येथील तरुण दाम्पत्याची भारतात परत येण्यासाठी याचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 21:58 IST

त्यांना परत आणण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल प्रयत्नशील

धुळे : विवाहानंतर मेथी (ता. शिंदखेडा) येथील दाम्पत्य मालदीव येथे फिरायला गेले आहे. या दाम्पत्यापैकी पत्नीचा मालदीव येथे केलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये क्वारंटाइन केलेले आहे. मात्र, भारतातील ट्रॅव्हल्स कंपनी व मालदीवमधील हॉटेल व्यवस्थापनाचा गलथानचा फटका या दाम्पत्याला बसला आहे. या दाम्पत्याने भारतात परण्यासाठी केंद्र सरकारकडे याचना केली आहे. त्याची दखल घेत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार राम सातपुते यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.शिंदखेडा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदा गिरासे व मेथी येथील उपसरपंच नरेंद्रकुमार गिरासे यांचा मुलगा विरपाल गिरासे यांचा नुकताच विवाह पार पडला़ विवाह झाल्यानंतर ते सपत्निक मालदीव येथे फिरण्यासाठी गेले़ जाताना भारतात दोघांचे कोरोना चाचणी घेतली, त्यात दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले़ त्यानंतर, दोन्ही जण मालदीवला पोहोचले़ एक दिवस फिरल्यानंतर तेथे परत त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात विरपाल यांच्या पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले़ त्यानंतर, दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले. हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना कुठलीही सुविधा दिलेली नाही. त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना खाण्यापिण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधा काहीही उपलब्ध करून दिली जात नसल्याचे सांगण्यात आले़ हॉस्पिटललाही दाखल होऊ देत नाहीत, एकमेकांनाही भेटू देत नाहीत. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप होत असून, येथून आमची लवकर सुटका व्हावी, यासाठी त्यांनी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्याकडे याचना केलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे