पारोळा चौफुलीवर लुटमार, पाठलाग करुन दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST2021-03-13T05:04:58+5:302021-03-13T05:04:58+5:30

बुलडाणा जिल्हयातील खामगाव येथील मोहम्मद शाकीर हे बुधवारी रात्री आपल्या दुचाकीने खामगाव येथे आपल्या घरी जात होते. बुधवारी ...

Parola looted at Chaufuli, chased and caught the two | पारोळा चौफुलीवर लुटमार, पाठलाग करुन दोघांना पकडले

पारोळा चौफुलीवर लुटमार, पाठलाग करुन दोघांना पकडले

बुलडाणा जिल्हयातील खामगाव येथील मोहम्मद शाकीर हे बुधवारी रात्री आपल्या दुचाकीने खामगाव येथे आपल्या घरी जात होते. बुधवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास शहरानजिक पारोळा चौफुलीजवळ फुलांच्या दुकानानजिक उभे असताना दोन तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी फागणे गावाचा पत्ता विचारण्याचा बहाणा केला. जवळ येत बोलत असताना अचानक त्यांनी मोहम्मद शाकीर यांचे दोन्ही हात पकडून बळजबरीने खिशातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि ५०० रुपये रोख काढून घेत मोटारसायकलीवरुन धूम ठोकली. त्यांचा पाठलाग करीत शाकीर यांनी आरडा ओरड केली असता कृषी महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांना पकडले. त्यांना आझादनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता अजय प्रकाश पाटील (२४, र. वाडीभोकर रोड, देवपूर धुळे) आणि दीपक सुनील सोनटक्के (२०, रा. गल्ली नंबर ७, धुळे) असे त्यांची नावे समोर आली. या दोघांविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Parola looted at Chaufuli, chased and caught the two