शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दातर्ती शिवारात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST

संगणक परिचालकांच्या आंदोलनाला भेट म्हसदी : संगणक परिचालकांचे विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलन ...

संगणक परिचालकांच्या आंदोलनाला भेट

म्हसदी : संगणक परिचालकांचे विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलन स्थळाला शेवाळी गावाचे भूमिपूत्र तथा काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे यांनी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.

प्रा.डाॅ. बाविस्कर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

कुसुंबा : श्रीमती एनएमसी महाविद्यालयातील प्रा. डॅा. सुनील बाविस्कर यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ७ मार्च २१ रोजी शिर्डी येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे

धुळे : जिल्ह्यात पाचवी ते पदवीपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. मात्र अनेक ठिकाणी आता मास्क, सॅनिटायझर याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने, शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

पेट्रोल दरवाढीने रिक्षाचालक चिंतेत

धुळे : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर सारखे वाढत असल्याने प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक चिंताग्रस्त झालेले आहेत. प्रवासी भाडेवाढवून देत नाही. मात्र पेट्रोल तेवढेच लागत असून, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची तक्रार आहे.

वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने समाधान

धुळे : अनेक वर्षानंतर कमलबाई कन्या शाळेच्या चौकात वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने, वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र याची अंमलबजावणी नियमित झाली पाहिजे. तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्येही वाहतूक सिग्नल सुरू कऱण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वाहतूक सिग्नल सुरू झाल्यास वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.

अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये

धुळे : शहरातील जुनी महानगरपालिका ते पारोळा चौफुलीपर्यंत सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी असते. अशातच अवजड वाहने आल्यास, वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अवजड वाहनांना या रस्त्यावर बंद घालण्याची गरज आहे

चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल बांधावा

धुळे : चाळीसगाव चौफुलीवर वाहनांची प्रचंड गर्दी असते. या परिसरातून अवजड वाहनांची सारखी वर्दळ असते. त्यामुळे चाळीसगावकडे जाणाऱ्या चालकांना रस्ता पार करण्यासाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपुलाची गरज आहे.

शेतकऱ्यांना दादर बियाणे वाटप

तिसगाव ढंढाणे : विकेल ते पिकेल या कार्यक्रमांतर्गत आत्मा प्रकल्पाच्या वतीने पढावद येथे गो ऑरगॅनिक शेतकरी बचत गटामार्फत रेवती दादर बियाणे वाटप करण्यात आले. शेतकरी अनंत ठाकरे, शरद निकम, किशोर पवार यांच्या शेतावर जाऊन आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस.डी.मालपुरे, कृषी अधिकारी विनय बोरसे, संदीप पवार, नवनाथ साबळे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.