गर्दीमुळे व्यापारी संकुले बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:06 PM2020-07-09T19:06:06+5:302020-07-09T19:06:25+5:30

व्यापाऱ्यांचा विरोध : आमदारांसह प्रशासनाकडे धाव

Orders to close merchant complexes due to congestion | गर्दीमुळे व्यापारी संकुले बंद करण्याचे आदेश

dhule

Next

धुळे : दुकानदारांसह ग्राहक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत नसल्याने महानगरपालिकेच्या मालकीची व्यापारी संकुले बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करीत व्यापाºयांनी गुरूवारी आमदारांसह जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली आणि दुकाने सुरू करण्याची मागणी केली़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे अडीच ते तीन महिने दुकाने बंद होती़ व्यापाºयांचे नुकसान होवू नये म्हणून तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’च्या माध्यमातून शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली़ जिल्हाधिकाºयांना प्राप्त अधिकारांमुळे धुळे शहरात आठ दिवस उशिराने परवानगी मिळाली़ परंतु बाजारात आणि दुकानात सातत्याने गर्दी होवू लागली आणि त्यानंतर शहरात कोरोनाचा संसर्ग देखील वाढला़ त्यामुळे परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका क्षेत्रामध्ये झोनल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली़ झोनल अधिकाºयांनी बाजारात फेरफटका मारुन परिस्थितीची पाहाणी करावी, फोटो आणि व्हीडीओ चित्रीकरणासह वस्तुस्थितीचा अहवाल दर तीन तासांनी सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते़ त्यानुसार झोनल अधिकारी गेल्या आठवड्यापासुन परिस्थितीची पाहणी करीत होते़
महानगरपालिकेच्या ताब्यातील व्यापारी संकुलांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, दुकानदार नियम पाळत नाहीत, सम विषमचा नियम न पाळत दुकाने सुरू आहेत, त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांना जिल्हाधिकाºयांना दिला़ त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी महानगरपालिकेच्या ताब्यातील व्यापारी संकुले बंद करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार गुरूवारी महापालिकेच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने व्यापारी संकुलांमधील सर्व दुकाने बंद केली़
दरम्यान, व्यापाºयांनी आमदार फारुक शाह, जिल्हाधिकारी संजय गायकवाड, आयुक्त अजीज शेख यांच्याकडे दुकाने सुरू करण्याची मागणी केली़ व्यापाºयांनी दुपारी आमदारांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांची भेट घेवून चर्चा केली़ यावेळी गोपाल माने, कमल लुंड, भरत बजाज, प्रशांत चावडा, भुषण कटारीया, देवा खीलवाणी, पवन माधवाणी यांच्यासह इतर व्यापारी उपस्थित होते़
व्यापारी संकुलांमध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून बंदचे आदेश दिले आहेत़ मनपा आयुक्तांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले़ प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले़
ही संकुले बंद दोन दुकानांवर कारवाई
४महानगरपालिकेच्या मालकीचे गरुड कॉम्प्लेक्स, डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन कॉम्प्लेक्स, प्रबोधनकार ठाकरे संकुल, नाशिककर संकुल, बुरहानी आणि तोलाणी कॉम्प्लेक्स आदी व्यापारी संकुले बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ दरम्यान, नियम न पाळणाºया दोन दुकानांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़
गरूड कॉम्प्लेक्समधील मोबाईलच्या दुकानांवर दिवसभर गर्दी असते़ या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही़ त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ परंतु सर्व नियमांचे पालन केले जात असून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी़ नियम न पाळणाºया दुकानांवर कारवाई करावी, असे व्यापाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले़

Web Title: Orders to close merchant complexes due to congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे