शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:39 IST

गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंदचा निर्णय

पिंपळनेर - शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंतेचा विषय झाला आहे़ यावर तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने शहरातील सर्व व्यवहार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.पिंपळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चार दिवसांच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीवरून शहरात ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत़ त्यात काही उपचार घेत आहेत तर काही घरीच होमक्वारंटाईन आहेत. सध्या सर्वत्र रुग्णाची संख्या वाढत असताना आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण मिळून येत असल्याने शहरातील काही शैक्षणिक संस्थांनी ३१ मार्च पर्यंत शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पिंपळनेर - सामोडे या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सदर प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. याला ग्रामपंचायत कार्यालय पदाधिकारी, महसूल विभाग व पोलीस स्टेशन यांची संयुक्त बैठक होऊन निर्णय मान्य केला.नागरिक व व्यवसायिकांना लॉकडाऊन नको असेल सर्वांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंग आदी नियम पाळून काही दिवसातच आपण कोरोनाला हद्द पार करू शकतो. पण शहरात नागरिकांची बेफिकेरी व नियम न पाळणे हे शहरातील रुग्ण संख्या वाढीचे कारण होत आहे़ रस्त्यालगत असलेले व्यवसायिक, फेरीवाले, हॉटेल व्यवसायिक हे नियम पाळताना दिसत नाहीत़ नागरिक बिना मास्कचे फिरतांना दिसतात़ विना मास्क फिरणाऱ्यांवर होऊन देखील नागरिक बिनधास्त वागत आहेत़ गर्दी करून गप्पा मारणे, विना कारण फिरणे, आदी रुग्ण संख्या वाढीचे वेगाने कारण ठरत आहे.