शिरपूरकरसह साक्रीकरांसाठी आता शिवभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:15 PM2020-04-02T21:15:40+5:302020-04-02T21:16:01+5:30

कोरोना इफेक्ट : गरीब व गरजु व्यक्तींना स्वस्त दरात भोजन

Now Shiv bhojan for Sakrikar along with Shirpurkar | शिरपूरकरसह साक्रीकरांसाठी आता शिवभोजन

शिरपूरकरसह साक्रीकरांसाठी आता शिवभोजन

Next

शिरपूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर आदी लोकांचे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने जेवणाअभावी हाल होत होते़ तत्पूर्वी, शहरातील सामाजिक संघटनेने त्यांच्यापर्यंत जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम करीत आहेत़ असे असतांनाही शासनाच्यावतीने शहरात दोन ठिकाणी शिवभोजन व्यवस्था करण्यात आली आहे़ सोबतच पप्पाजी की थाली येथे सुध्दा हा उपक्रम सुरू करण्यात आला़
शहरात सर्व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत़ बाहेरून याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ तसेच नोकरीसाठीही बाहेरील कुटुंबे येथे स्थायिक आहेत़ सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेले आहे़ त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ लॉकडाऊनच्या काळात सुरूवातीला कसे बसे २-३ दिवस लोकांना घालवले़ मात्र मोठ्या संख्येने मजूर, बेघरवासीयांच्या दोनवेळ अन्नाचा प्रश्न निर्माण झाला असतांना शहरातील सामाजिक संस्थांनी अशा लोकांना लागलीच तिथंपर्यंत जेवणाचे डबे, पाणी पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़
शहरातील रूग्णालयात दाखल असलेले रूग्ण व त्यांचे आप्तजण, गरीब, गरजु, रोजदारी करणारे जनतेचे हाल होवू नये म्हणून तसेच स्थलांतरीचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून शासनाच्यावतीने शहरातील महाराजा कॉम्प्लेक्समध्ये व मार्केट कमिटीच्या आवारात स्वस्त दरात शिवभोजन योजने अंतर्गत भोजनालय आजपासून सुरू करण्यात आले़ यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, आमदार काशिराम पावरा, भूपेशभाई पटेल, तपनभाई पटेल, प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल, तहसिलदार आबा महाजन, सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया आदींची उपस्थिती होती़
साक्रीतही शिवभोजनाला सुरुवात
साक्री : साक्री शहरात बस स्टॅन्ड रस्त्यावर भोजन थाळी सेंटर सुरू करण्यात आले़ आमदार मंजुळा गावित, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, डॉ़ तुळशीराम गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ गोरगरिबांना आता अवघ्या पाच रुपयात भोजनाचा आनंद घेता येणार आहे. शिवभोजन थाळीचे केंद्र साक्री शहरात सुरू व्हावे म्हणून शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल देसले व विधानसभा संघटक पंकज मराठे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता़ केंद्राचे उद्घाटनाप्रसंगी सोशल डिस्टन्स चे भान ठेवण्यात आले़ यावेळेस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भूपेश शहा, सक्री शहर प्रमुख बंडू गीते, उप शहर प्रमुख बाळा शिंदे, किशोर वाघ, धनराज चौधरी, वैभव सोनार, अकबर शेख, वैभव भिंगारे, हिम्मत सोनवणे, केशव शिंदे, सुनील बागुल, दशरथ भवरे, यशवंत जाधव, भटू लाडे, मोबीन पठाण, विनोद पाटील, आप्पा चाळसे, बंडू भामरे, नदीम पठाण, भटू उंडे आदी उपस्थित होते़

Web Title: Now Shiv bhojan for Sakrikar along with Shirpurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे