एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:37+5:302021-04-24T04:36:37+5:30

बोराडी ग्राम परिषदेच्या कार्यालयात कोविडच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठकीत बोलत होते. सरपंच सुरेखा पावरा अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जताबाई ...

No one should be deprived of vaccination | एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये

एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये

बोराडी ग्राम परिषदेच्या कार्यालयात कोविडच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठकीत बोलत होते.

सरपंच सुरेखा पावरा अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा, शिरपूर पंचायत समिती सदस्य सरिताबाई पावरा, ग्रामविकास अधिकारी डी. आर. पेंढारकर, शिक्षण विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड, जे. पी. जोशी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, विशाल पावरा, नितीन पाटील, मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य डोंगरसिंग पावरा, पोलीस पाटील अनिल पावरा, राजू सूर्यवंशी, चंद्रकांत वाघ, कविता बडगुजर, सुषमा वाल्हे, सरला पाटील, संदीप पवार, प्रतीश कोळी, शांताराम बिऱ्याडे, अंबादास सगरे, लक्ष्मण गोपाळ, उमेश पावरा, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक वाय. आर. पाटील, विजया पाटील, दिनेश श्रीराव, तसेच आरोग्य, शिक्षण, आशा वर्कर, अंगणवाडी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

उपसरपंच राहुल रंधे म्हणाले की, बोराडी गावात मागील आठ दिवसातील संपर्क आलेले लोकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यादी करून स्वॅब घेणे, गावात सलग २ ते ३ दिवस रुग्ण आल्यास स्वॅब कॅम्प घेणे, गावात स्वच्छता, कंटेन्मेंट झोन बोर्ड व आरोग्य सर्वेक्षण, गावात व्यवस्था, होम आयसोलेशनमधील पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर न फिरणे, गावात लग्नात गर्दी न होऊ देणे, मास्कचा वापर याबाबत ग्राम समितीने चोख जबादारी पार पाडावी. तसेच कोरोना महामारीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाईदेखील केली जाईल. बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी आर. ओ. फिल्टर लावण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी, लोकांच्या मनातील लसीविषयी भीती दूर करून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत.

Web Title: No one should be deprived of vaccination