शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात तीक्ष्ण हत्याराने वार करीत एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गरूड हे दुचाकीवरून रात्रीच्यावेळी महापालिकेच्या जुन्या इमारतीकडून तहसील कार्यालयाकडे येत असताना अज्ञाताने त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने ...

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गरूड हे दुचाकीवरून रात्रीच्यावेळी महापालिकेच्या जुन्या इमारतीकडून तहसील कार्यालयाकडे येत असताना अज्ञाताने त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. ते काँग्रेस भवनासमोर गंभीर अवस्थेत पडलेले होते. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, संतोष तिगोटे व पोलीस कर्मचारी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विशाल गरूड यास हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी पहाटे पावणे दोन वाजता त्यांना मयत घोषित केले.

पोलीस ठाण्यात गर्दी

विशाल गरुड यांचा कोणीतरी खून केल्याची बातमी सकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या नातेवाइकांसह हितचिंतकांनी शहर पोलीस ठाणे गाठले. मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने काही काळ शहर पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मारेकऱ्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्याने वातावरण निवळले.

खुनाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी शुक्रवारी योगेश पंडित पगारे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत.

घटनास्थळाचे नमुने

विशाल गरुड हे काँग्रेस भवनासमोर ज्या ठिकाणी आढळून आले, त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने रक्ताचे नमुने संकलित केले. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

भेट राहिली अपूर्ण

मयत विशाल याचे पत्नीशी घरगुती वाद असल्यामुळे ते एकत्र राहत नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून अमर नगरातील बहीण आशाबाई यांच्याकडे विशाल हे राहत हाेते. विशाल यांची पत्नी नीलिमा व तीन मुले हे साक्री रोडवरील अजिंक्यतारा सोसायटी येथे राहतात. त्यामुळे विशाल गरुड हे आवठवड्यातून दर शनिवारी त्यांच्या घरी जात होते; परंतु शुक्रवारीच विशाल यांचा मृत्यू झाल्याने त्यांची मुलांशी होणारी शनिवारची भेट अपूर्णच राहिली.

भाच्याशी झाला संवाद

विशाल गरुड हे दररोज रात्री साडेदहा वाजेपर्यंत घरी येत असत. गुरुवारी सकाळी बाहेर जावून दुपारी जेवायला आले होते. सायंकाळी ५ वाजता ते घरातून निघाले. शुक्रवारी सव्वा बारा वाजेपर्यंत ते घरी आले नव्हते. त्यामुळे बहीण आशाबाई यांनी मामाला फोन लावण्याचे मुलाला सांगितले. भाच्याने विशाल यांना साडेबारा वाजता फोन लावला तेव्हा घरी येण्याचे सांगितले असता, १० मिनिटांत घरी पोहोचतो, असे त्यांनी सांगितले; मात्र त्यांचा हा संवाद अखेरचा ठरला. दरम्यान, विशाल गरुड हे पत्रकार पुरुषोत्तम गरुड यांचे बंधू होत.