मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:03 IST2019-02-21T23:02:22+5:302019-02-21T23:03:04+5:30

महापालिका : आमदार डॉ़ सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान

 Municipal Commissioner Sudhakar Deshmukh received state-level award | मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार

dhule

धुळे : प्रशासकीय सेवेत उल्लेखनिय कामगीरीची दखल घेऊन नाशिक येथील जाणीव सामाजिक अभियानातर्फे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथील परशुराम साईखेकर नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्रा.जोगेेंद्र कवाडे यांच्या हस्ते आयुक्त देशमुख यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़ या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी विनायक पाटील, वीरमाता निलाताई आमले, स्मित पाटील, पुष्पा काळे, जगन्नाथ पाटील, डी. आर.पाटील आदी उपस्थित होते.
पुरस्काराचे मानकरी
सिन्नरचे केशव गोसावी (मरनोत्तर), शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ़ सुवर्णा खरात, नगर जिल्हा बॅकेच्या संचालक चैताली काळे, जळगावच्या शिक्षिका ताराबाई चव्हाण, कार्यकारी अभियंता बाजीराव पाटील,
नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक डॉ़ प्रशांत देवरे, निफाळचे नगरसेवक देवदत्त कापसे यांना पुरस्कार देण्यात आला होता़

Web Title:  Municipal Commissioner Sudhakar Deshmukh received state-level award

टॅग्स :Dhuleधुळे