शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

त्या आठ सदस्यांविना पार पडली धुळे पंचायत समितीची मासिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 22:49 IST

सभापतींचे आदेश : आचारसंहिता लागू होण्याआधी विकासकामांच्या वर्कऑर्डर द्या

धुळे : येथील पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेला ते आठ सदस्य अनुपस्थित होते. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सदस्यत्व रद्द झालेले ओबीसी संवर्गातील आठ सदस्यांविना सभा पार पडली. ३० पैकी केवळ १७ सदस्य सभेला उपस्थित होते. या आठ जागांवर पुन्हा निवडणूक होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी सदस्यांनी सुचविलेल्या विकासकामांचे कार्यारंभ आदेश जारी करावेत, असे आदेश पंचायत समितीच्या सभापतींनी दिले आहेत.पंचायत समितीची मासिक सभा सभापतींच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी उपसभापती विद्याधर पाटील, गटविकास अधिकारी गौतम सोनवणे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट, गण आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे पडसाद सभेतदेखील उमटले. पंचायत समितीच्या सभागृहातील ३० सदस्यांपैकी ओबीसी संवर्गातील आठ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यामुळे संबंधित सदस्य सभेत उपस्थित राहू शकले नाहीत. शिवाय इतर पाच सदस्य गैरहजर असल्यामुळे १७ सदस्यांच्या उपस्थितीत मासिक सभा पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर दोन आठवड्यांच्या आत फेरनिवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे कुठल्याही क्षणी फेरनिवडणूक घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित विकासकामांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि कार्यादेश द्यावेत, असे आदेश सभापतींनी सर्व विभागप्रमुखांना दिले.सद्य:स्थितीत तालुक्यात कुठेही पाणीटंचाईची स्थिती उद्भवलेली नाही. परंतु तशी परिस्थिती असल्यास तत्काळ विहीर अधिग्रहण करण्याचे कार्यवाही हाती घेण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे