शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात उधारीच्या पैशांचा वाद  लोखंडी रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:09 IST

पाच जणांविरुध्द गुन्हा : जखमीवर उपचार

धुळे : उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरुन एका तरुणाला मारहाण केल्याची घटना शहरातील राणाप्रताप चौकात शनिवारी रात्री घडली़ यात सर्रासपणे लोखंडी रॉडचा वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी आझादनगर पोलिसात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ शहरातील वाखारकर नगरात राहणारा तेजस संजय जैन (१८) या तरुणाने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, गल्ली नंबर ६ मधील राणा प्रताप चौकातील एचडीएफसी बँकेजवळ अडवून उधारीचे पैसे मागण्यासाठी आलेल्या पाच जणांनी शिवीगाळ केली़ जीवे ठार मारण्याची धमकी देवून लोखंडी रॉडने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारहाण करण्यात आली़ यात गुडघ्याची वाटी फॅक्चर झाली आहे़ शिवाय लाथाबुक्यांनीही मारहाण करण्यात आली़ मारहाणीची घटना शनिवार १२ आॅक्टोबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली़ अचानक घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ या घटनेनंतर लागलीच तेजस जैन याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी तेजस जैन याने आझादनगर पोलीस ठाण्यात रविवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, जगदीश भवरलाल प्रजापती, त्यांची दोन मुले (रा़ गल्ली नंबर ६, धुळे) आणि अनोळखी दोन व्यक्ती अशा पाच जणांविरुध्द भादंवि कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस हेड कॉन्स्टेबल एम़ सी़ पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस