शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यातील पिकांना गिरणेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 21:31 IST

संडे अँकर । पाणी सोडण्याच्या आमदारांच्या सूचना, चांदे, मोरदड, खोरदड, शिरुड येथील शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील चांदे, मोरदड, खोरदड, शिरुड व इतर गावातील लाभधारक शेतकऱ्यांना गिरणा पांझण डावा कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी गिरणा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाºयांना दिल्या़मोरदड, खोरदड मायनर एक या नविन पाटचारीतून पहिल्यांदाच पाणी सोडणार असल्याने ऐन उन्हाळ्यात रब्बीच्या पिकांना जीवदान मिळणार आहे़गिरणा डाव्या कालव्यातून धुळे तालुक्यातील शिरुड परिसरातील गावांना पाण्याचा लाभ दिला जातो़ परंतु चाळीसगाव तालुक्यातील गावांना जास्तीचे पाणी आवर्तन सोडले जात असल्याने धुळे तालुक्यातील शेतकरी वंचित राहतात़ हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार पाटील यांनी शेतकºयांसह गिरणा डावा कालवा अधिकाºयांची नुकतीच बैठक घेतली़ पाण्याअभावी पिके करपत आहेत़ आमच्या हक्काचे पाणी देखील आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची कैफीयत या बैठकीत शेतकºयांनी मांडली़ तसेच चांदे, तरवाडे, नाणे, सिताणे, मोरदड तांडा, खोरदड तांडा, शिरुड, मोरदड, खोरदड या गावांना पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी यावेळी शेतकºयांनी केली़धुळे तालुक्यासाठी राखीव असलेले गिरणा प्रकल्पातील पाणी पुर्ण क्षमतेने सोडण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी अधिकाºयांना केल्या़ यावेळी बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, गिरणाचे उप अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस़ आऱ पाटील, आऱ आऱ वाघ, चांदे येथील शेतकरी रावसाहेब पाटील, अशोक पाटील, हरी पाटील, अधिकार पाटील, धर्मराज भवर आदी उपस्थित होते़दरम्यान, ऐन उन्हाळ्यात पिकांसाठी गिरणा प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे़मोरदड मायनर पाटचारी कोरडीचमोरदड, खोरदड मायनर पाटचारी क्रमांक एकचे काम गेल्या काही वर्षांपासुन पुर्ण झाले आहे़ परंतु या पाटचारीतून अजुनपर्यंत पाणी सोडलेले नव्हते़ या पाटचारीतुनही पाणी सोडण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या आहेत़ रोटेशन प्रमाणे प्रत्येक शेतकºयाचा पाण्यावर हक्क आहे़ कुणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी़ याआधी ज्या शेतकºयांच्या पिकांना पाणी मिळाले आहे त्यांनी इतर शेतकºयांच्य पिकांना पाणी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी बैठकीत केले़

टॅग्स :Dhuleधुळे