२ लाखांसाठी विवाहितेचा छळ, ६ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:59 IST2020-01-31T11:59:18+5:302020-01-31T11:59:46+5:30

वरूळ-घुसरे येथील घटना : पतीसह सासरच्या मंडळीवर शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Marriage torture for 5 lakhs, 2 for crime | २ लाखांसाठी विवाहितेचा छळ, ६ जणांवर गुन्हा दाखल

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील देवीचे वरुळ येथे पैशांसाठी विवाहितेला मारहाण, शिवीगाळ केल्याची घटना घडली़ माहेरुन दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शोभाबाई गणेश कोळी असे या विवाहितेचे नाव आहे़
शिंदखेडा तालुक्यातील वरुळ घुसरे येथील माहेर असलेल्या शोभाबाईचे लग्न देवीचे वरुळ येथील गणेश राजाराम कोळी याच्याशी झाले होते़ महिलेच्या फिर्यादीनुसार सासरच्या लोकांनी सुरूवातीला चांगली वागणूक दिली़ त्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरुन २ लाख रुपये आणावेत, तु दिसायला काळी आहे, लग्नात मानपान दिला नाही अशा कारणांवरुन मारहाण शिवीगाळ करीत छळ केला़ शोभाबाईच्या आईवडीलांनी सासरच्या लोकांची अनेकदा समजूत काढली़ परंतु त्यांच्या वागणुकीत फरक पडला नाही़ त्रास वाढल्याने गेल्या ७ वर्षांपासून मी माहेरी आहे़ दि़ १५ डिसेंबर २०१९ रोजी सासरच्या लोकांनी माहेरी येवून मारहाण केली़ तसेच फिर्याद मागे घेण्यास सांगितले़ पुन्हा पैशांची मागणी केली़ त्यामुळे मी नांदण्यासा नकार दिला असे शोभाबाईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी शोभाबाई गणेश कोळी या महिलेच्या फिर्यादीवरुन पती गणेश राजाराम कोळी, कमलाबाई राजाराम कोळी, संजय दशरथ कोळी, कल्पना संजय कोळी, रेखाबाई बापू कोळी, देवा कोळी यांच्याविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Marriage torture for 5 lakhs, 2 for crime

टॅग्स :Dhuleधुळे