शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आगामी पाच वर्षात महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:30 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांची दोंडाईचा येथे सभा : आता स्पर्धा देशातील राज्यांशी नव्हे तर युरोप राष्टÑांशी करणार

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेनिमित्त झाली सभामुख्यमंत्र्यांनी यात्रेचा उद्देश केला स्पष्ट

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या पाच वर्षात जलसिंचनाची अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. आगामी काळात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्टÑ दुष्काळमुक्त केला जाईल. तसेच अक्कलपाडा, सुलवाडे-जामफळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याला यापुढे कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. दरम्यान आगामी काळात महाराष्टÑाला सर्वच क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा येथील जाहीर सभेत केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचा दुसरा टप्पा गुरूवारपासून धुळ्यातून सुरूवात झाला. यानंतर दोंडाईचा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा खा. डॉ. सुभाष भामरे, अशोक कांडेलकर, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुमार कुंवर, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, डॉ. माधुरी बोरसे आदी उपस्थित होते.पाचवर्षात केलेली विकास कामे जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने युतीच्या हाती सत्ता सोपविली. या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. मात्र प्रत्येक आव्हानाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले. गेल्या पाच वर्षात राज्य उद्योग, रोजगार क्षेत्रात पहिल्याक्रमांकावर आणले. तर आरोग्य आणि शिक्षणाच्याबाबतीत राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आगामी काळात शिक्षण क्षेत्रातही महाराष्टÑ आघाडीवर असेल.दुष्काळ, बोंडअळी यामुळे राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीत आला. मात्र या अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सिंचनाच्या क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडवून आणले. जिल्ह्यातील सुलवाडे-जामफळ हा महत्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र मोदींनी या प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे आगामी काळात हे प्रकल्प पूर्ण होवून हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. अक्कलपाडा, सुलवाडेच्या माध्यमातून या भागाला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. 

टॅग्स :Dhuleधुळे