एम. राम कुमार धुळ्याचे नवीन पोलीस अधीक्षक

By Admin | Updated: April 28, 2017 12:52 IST2017-04-28T12:52:45+5:302017-04-28T12:52:45+5:30

पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्ऱ 4 चे समादेशक एम़ राम कुमार यांची नियुक्ती झाली आह़े तर पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांची नागपूर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आह़े

M. Ram Kumar Dhule's new Superintendent of Police | एम. राम कुमार धुळ्याचे नवीन पोलीस अधीक्षक

एम. राम कुमार धुळ्याचे नवीन पोलीस अधीक्षक

 धुळे, दि.28- नव नियुक्त पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्ऱ 4 चे समादेशक एम़ राम कुमार यांची नियुक्ती झाली आह़े तर पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांची नागपूर पोलीस उपायुक्त म्हणून  बदली झाली आह़े अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची औरंगाबाद येथे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आह़े त्याच्या जागी अमरावती शहराचे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांची नियुक्ती झाली आह़े तसेच धुळे येथील एसआरपीएफचे समादेश एस़ आऱ दिघावकर यांची पदोन्नतीने अपर पोलीस आयुक्त म्हणून (दक्षिण प्रादेशिक विभाग) नागपूर शहर येथे बदली झाली आह़े पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत बच्छाव यांची अमरावती येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आह़े त्यांच्या जागी श्रीरामपूर (जि़ अहमदनगर) येथील अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची नियुक्ती झाली आह़े 

Web Title: M. Ram Kumar Dhule's new Superintendent of Police