शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांवर आयोडीनचे प्रमाण आढळले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 22:09 IST

शिरपूर : बीडीओंनी दिले आरोग्य विभागाला कारवाईचे आदेश

शिरपूर : तालुक्यातील काही गावांमध्ये दुकानांवर १५ टक्के पेक्षा कमी आयोडीन असणारे मीठ आढळून आलेले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने तपासणी केली असता ही बाब समोर आलेली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी सदर मीठ विक्रेत्या दुकानदारांना लेखी सूचना देऊन शिल्लक मीठ सील करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.तालुक्यातील होळनांथे, विखरण व वाकवड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मिठाची तपासणी करण्यात आलेली होती. जानेवारी २०२१ मध्ये धुळे येथील जिल्हा सार्वजनिक प्रयोगशाळा येथे मीठात आयोडीनचे प्रमाण तपासण्यासाठी पाठविण्यात आलेले होते. त्यात काही दुकानांवरील उपलब्ध असलेल्या मिठामध्ये १५ टक्के कमी आयोडीनचे प्रमाण आढळून आलेले आहे. हे आरोग्याला अतिशय घातक आहे, तसेच ही बाब गंभीर आहे. त्यासाठी ज्या दुकानांवर हे मीठ आढळून आलेल्या त्या दुकानदारांना लेखी आदेश देण्यात यावा. तसेच सदर मिठाचा शिल्लक साठा सील करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे यांनी दिले आहेत.यावेळी दुकानदारास आयोजन प्रमाणित मीठ उपलब्ध करून देण्याविषयी प्रभावी आरोग्य शिक्षण देण्यात यावे. या भागात आयोडीनयुक्त मिठाचे महत्त्व व प्रमाण इत्यादी बाबत जनजागृती करण्यात यावी. तसेच या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक व आशा कार्यकर्त्यांना नागरिकांना गलगंड व आयोडीन कमतरतेमुळे होणारे विकार यातील संशयितांचा शोध व आरोग्य संवर्धन या विषयी माहिती असणे आवश्यक असल्याच्याही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. यात हिरा ब्रांडच्या पद्मावती सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या मिठाचे नमुने घेतले असता त्यांच्या आयोडीनचे प्रमाण कमी आढळून आले आहे.१५ जानेवारी २०२१ रोजी वकवाड येथे घेण्यात आलेल्या हिरा ब्रँड कंपनीच्या पद्मावती सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड या मिठात ११.६४ आयोडीन आढळून आलेले आहे. २० जानेवारी २०२१ रोजी होळनांथे येथे घेण्यात आलेल्या हीरा ब्रँड कंपनीच्या पद्मावती सॉल्ट प्राईवेट लिमिटेड या कंपनीच्या मिठाचे दोन नमुने घेण्यात आले होते. यात एकात १२.७० टक्के तर दुसºया नमुन्यात फक्त ६.३५ टक्के आयोडीन आढळून आले आहे. तर विखरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात २१ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या दुकानावरून हिरा ब्रँड कंपनीच्या पद्मावती सॉल्ट प्राईवेट लिमिटेड यात ११.६४ टक्के आयोडीन आढळून आलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे