फिजिकल अंतराचे हरवले भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:49 PM2020-07-09T18:49:29+5:302020-07-09T18:50:13+5:30

शिरपुरात कोरोना बाधितांची संख्या ४९५ : बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी

Lost consciousness of physical distance | फिजिकल अंतराचे हरवले भान

dhule

Next

शिरपूर : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा पाचशेच्या उंबरठ्याजवळ आहे. त्यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३४२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार व प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत़ सार्वजनिक ठिकाणी जातांना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे़ मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करतांना दिसून आले तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे.
शिरपूर शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिरपूर पोलिस, नगरपालिका व महसूल प्रशासन पुढे आले असून शहरात फिरणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावला आहे की नाही याची पडताळणी घेतली जात आहे़ मास्क न वापरविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे़ तसेच विना नंबर वाहन व दुचाकीवर डबलसीट जाणाºया स्वारांवर देखील कारवाई केली जात आहे़
मेनरोड, बाजारपेठ, आंबा बाजार आदी ठिकाणी तर ठेला, गाड्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडविलेला दिसत आहे. बँकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याचे पालन होत नसल्याचे दिसून येते़ बाजारपेठेत सर्वत्र दुचाकी, वाहनांची गर्दी दिसते़ भाजीपाला विक्रेते, स्वीट मार्ट, किराणा दुकानावर नागरिक गर्दी करतांना दिसून येत आहे़ मात्र फिजिकल अंतराची ऐशीतैशी केल्याचे दिसते़ ना दुकानदार त्यांना याबाबत सूचना करतात, ना स्वत: नागरिक याबाबत जागरूकता दाखवतांना दिसून येत आहेत. सर्वत्र नागरिकांचा मुक्त संचार असल्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे़
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही सुज्ञ नागरिक सज्ज झालेले दिसून येतात. त्यांनी मास्क व सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे़ सर्दी, खोकला किंवा फ्ल्यू सदृश लक्षणे असल्यास मास्क अधिक आवश्यक आहे.
आपल्यासह दुसºया व्यक्तींना संसर्ग होवू नये, यासाठी मास्क महत्वाचा आहे़ तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यापासून मास्कची खरेदी वाढली आहे़ खरेदी केलेले मास्क पुन्हा एकदा निर्जंतूक करून नागरिक त्याचा वापर करीत आहेत़ एन ९५ मास्कचा कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रूग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका तेथील कर्मचाºयांसाठी अधिक वापर होत आहे़ हा मास्क घालण्यापूर्वी त्यातून हवा थेट आत जाणार नाही, याची काळजी घेतली जाते़ त्यामुळे तो मास्क घालण्याची शास्त्रीय पध्दत आहे़ त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते़ काही नागरिक आता हा मास्क सर्रास वापरतांना दिसत आहेत़ त्यामुळे रूग्णालयात काम करणाºयांशिवाय इतरांनी हा एन-९५ मास्क घालणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे़ दरम्यान, एकच मास्क वारंवार वापरणे देखील आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते़ त्यामुळे मास्क बदलणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील २५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव
४३० जूनपासून येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांचे स्वॅब घेणे बंद करण्यात आले होते़
४३ जुलैपासून पुन्हा स्वॅब घेणे सुरू करण्यात आले़ ७ जुलैपर्यंत २८८ जणांचे स्वॅब घेवून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे़ ४ तारखेनंतर एकही रिपोर्ट प्राप्त झालेला नाही़ ७ रोजी १४१ रिपोर्टपैकी ३८ बाधित आढळून आले आहेत.
४कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तहसिलदार आबा महाजन यांनी पंचायत समितीच्या आमदार अमरिशभाई पटेल सभागृहात आरोग्य विभागाची बैठक घेतली़ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते़ जनजागृती, प्रतिबंधात्मक सर्व्हेक्षण, ट्रेसिंगवर चर्चा झाली़
४शिरपूर शहरातील विविध ७२ वसाहतींमधील ३८८ तर ग्रामीण भागातील २५ गावांमधील १०७ असे एकूण आजअखेर ४९५ कोरोना बाधित मिळून आले आहेत़ त्यापैकी ३३३ रूग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत़ शहरातील २० तर ग्रामीण भागातील भाटपुरा १, खंबाळे १ व बाळदे येथील ३ असे २५ जणांचा मृत्यु झाला आहे़ बाळदे येथे १७ बाधित रूग्ण आढळून आले असून पैकी ३ जणांचा मृत्यु झाला आहे़

Web Title: Lost consciousness of physical distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे