शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कापडणे शिवारात गव्हाचे पीक तोट्यात, शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 22:09 IST

एक बिघा शेतातून आले गव्हाचे केवळ ‘शंभर’ रुपयांचे उत्पन्न

कापडणे - गव्हाचे पीक तोट्यात आले आहे़ आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी स्थिती निर्माण झाली आहे़ परिणामी शेतकरी हतबल झालेले आहेत़ धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात हा प्रकार समोर आलेला आहे़ एक बिघा शेतातून गव्हाचे केवळ शंभर रुपयाचे उत्पन्न आले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ ९ हजार रुपयांच्या उत्पन्नांपैकी ८ हजार ९०० रुपयांचा खर्च येत आहे़ साहजिकच १०० रुपये शिल्लक राहत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़धुळे तालुक्यातील कापडणे गावासह संपूर्ण परिसरात रब्बी हंगामातील प्रमुख पीक समजले जाणारे गहू पिकाची सध्या काढणी सुरू झालेली आहे़ एकरी गव्हाचे पीक १२ ते १५ क्विंटल येणे आवश्यक असते़ मात्र यंदाच्या खरीप हंगामात गव्हासाठी महत्त्वपूर्ण समजले जाणारे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात थंडीचे अतिशय अल्प प्रमाण होते म्हणून गहू पिकाचे उत्पादनात निम्मी पेक्षाही जास्त मोठी घट आलेली आहे त्यात अजून चिंतेची अधिक भर म्हणून ७ जानेवारी रोजी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील विविध शेती शिवारातील गहू पिके आडवे पडून जमीनदोस्त झालेले होते आडवे पडलेल्या गव्हाच्या लोंब्यातील दाणे परिपक्व न झाल्याने यामुळे देखील उत्पादनात मोठी घट आलेली आहे त्यात पुन्हा शेतकºयांचे गहू काढणीवर येत असल्याने दिनांक १८ फेब्रुवारी रोजी देखील रिमझिम अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकरी घाईगडबडीत हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढण्याचा प्रयत्न करीत आहेत यामुळे गहू अस्वच्छ घाण निघत असल्याने आधीच उत्पादनात घट व त्यात गव्हाची गुणवत्ता घसरल्याने खाजगी व्यापारी गव्हाला केवळ बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा प्रचंड कमी किमतीत गव्हाची खरेदी केली जात आहे. गहू पिकाला वाढीव आधारभूत किंमत जाहीर करून सरकारने गहू खरेदी करावा अशी शेतकºयांची मागणी होत आहे. थंडीचे प्रमाण कमी व अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट आल्याने एक बीघा शेतात केवळ सहा क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळत आहे प्रतिक्विंटल खाजगी व्यापारी बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटलच्या भावाने गहू खरेदी होत आहे यामुळे शेतकºयाला नऊ हजार रुपयाचे एका बिघात उत्पादन येत असले तरी मात्र खर्चही तेवढाच आहे. 900 रुपये शेती मशागत रोटावेटर मारणे 600 रुपये गहू पेरणी खर्च, 2000 रुपये बियाणे,1600 रुपये खते, 500 रुपये तन नाशक फवारणी, 1500 रुपये गव्हाला पाणी भरणे मजुरी, 1800 रुपये गहू काढणी हार्वेस्टर मशीन मजुरी एकूण आठ 8900 रुपये खर्च येत असल्याने 9000 आलेले उत्पादनातून खर्च वजा 8900 केल्यावर शिल्लक केवळ शंभर रुपये शेतकºयाच्या हाती मिळतात़ सर्वत्र हास्यास्पद गोष्ट असून चार महिने गव्हाला रात्रंदिवस पाणी भरून मोठे काबाडकष्ट करून एक बिघा शेतातून गहू पिकाचे उत्पादन केवळ शेतकºयाला शंभर रुपये हातात मिळत आहेत.