साठवलेला मका आणि कांदा चाळीत पाणी शिरून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:23+5:302021-05-18T04:37:23+5:30

भदाणे शिवारातील सुमनबाई ताराचंद माळी यांच्या मालकीची कांद्याची चाळ होती. या कांद्यासह अंदाजे १५ ते २० लाखांचे वादळी ...

Loss of lakhs of rupees to farmers due to infiltration of stored maize and onion | साठवलेला मका आणि कांदा चाळीत पाणी शिरून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

साठवलेला मका आणि कांदा चाळीत पाणी शिरून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Next

भदाणे शिवारातील सुमनबाई ताराचंद माळी यांच्या मालकीची कांद्याची चाळ होती. या कांद्यासह अंदाजे १५ ते २० लाखांचे वादळी पावसाने नुकसान झाले आहे. नेर व परिसरातील अनेक ठिकाणी झाडे, इलेक्ट्रिक खांब उन्मळून पडली. जमीनदोस्त चाळीखाली ६० टन कांद्याचे नुकसान झाले, तसेच भुईमूग, साठवलेला मका, गुरांचा सुकवलेला चारा पाण्यात भिजला. झाडावरील आंबे, लिंबू, भाजीपाला खराब झाला आहे. मोठ्या दराने भाव मिळतील, या आशेने कांदा व मका शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. मात्र, वादळी पावसाने मोठे नुकसान केले. भदाणे शिवारातील कोतवाल सुनील देवरे यांना नुकसानीची माहीती घेण्यास पाठविले. कोतवालाने त्वरित वरिष्ठांना नुकसानीची माहिती दिली.

शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नेर येथील शेतकरी दीपक खलाणे, सोनू माळी, नाना बोढरे, राजेंद्र कोळी, देविदास भदाणे, सुनील भागवत, सिद्धांत जैन, रावसाहेब खलाणे, साहेबराव गवळे, निंबा खलाणे, योगेश गवळे, योगेश वाघ, कैलास जयस्वाल, गोरख अहिरे, राजेंद्र खलाणे, बापू गवळे, पांडुरंग खलाणे, कपिल खलाणे, भटू माळी, भदाणे येथील सूरज मारनर, विजय श्रीराम, रवि पाटील, कैलास महाजन, विजय श्रीराम, गोकुळ श्रीराम, सोनू पाटील आदींनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत केल्याने समाधान

नेर येथील विद्युत कर्मचाऱ्याकडून रात्रीच काही भाग वगळता वीजपुरवठा सुरळीत केल्याने, नागरिकांनी कर्मचाऱ्याचे कौतुक केले. यामुळे नागरिकांची रात्री उकाड्यापासून सुटका झाली होती. मात्र, सोमवारी सकाळी ज्या भागात वीजपुरवठा खंडित होता. त्या भागात पुन्हा शर्थीचे प्रयत्न करत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. मात्र, दिवसभर वीजपुरवठा खंडित होता.

Web Title: Loss of lakhs of rupees to farmers due to infiltration of stored maize and onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.