शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये नागरिकांकडून गरजूंना मदतीचा ओघ सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:58 IST

पिंपळनेर : दररोज २५० व्यक्तीना मोफत जेवणाची सोय

पिंपळनेर : लॉकडाऊन काळात आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे, यासाठी  समाजसेवी व्यक्ती, सामाजिक संघटना आता आपल्या परीने हवी ती मदत गरजूंना करू लागले आहे.  येथील भोजन सेवा मंडळ पिंपळनेर यांच्या माध्यमातून दररोज २५० व्यक्तींना दुपारी व रात्रीचे भोजन घरपोच दिले जात आहे. अशी व्यक्ती आपल्या जवळपास असल्यास त्यांची नावे आमच्यापर्यंत पोहोच करावी असे आवाहन देखील ही समिती करीत आहे. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत ही भोजन सेवा देणार असल्याचे मत मंडळाचे कैलास गोगड यांनी कळविले आहे.  अपर तहसील विनायक थविल हे देखील प्रशासनाच्या आदेशावरून  गरजू व्यक्तींना मदत करीत संसारोपयोगी किराणा माल साहित्य पोहच करीत आहेत. राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम मार्शल स्कूल चेअरमन संभाजीराव अहिरराव हे शिव भोजनात सध्या फक्त सत्तर ताटांची मान्यता आहे या लोकांना जेवण देऊन, दररोज गोरगरीब गरजू अशा ६० ते ७० नागरिकांना जेवण्याची व्यवस्था स्वत:च्या खचार्ने करीत आहेत.दहीवेल येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते पंकज खैरनार व सुधीर भानुदास गांगुर्डे यांनी दहीवेल येथे रस्त्याच्या  बाजूला राहणारे गरजू कुुटुंबियांना   एक किलो तांदुळ, अर्धा किलो दाळ, एक किलो साखर, एक किलो चहा पावडर, एक किलो तेल अशा जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. पश्चिम पट्टयात  माजी खासदार बापू चौरे, काँग्रेस साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनीही तेल, साखर,  तांदूळ, चहापुडा यासह डाळी चे वाटप केले.  घाबरू नका पण स्वत:ची काळजी घ्या असा सल्ला देखील चौरे यांनी दिला. चिपलीपाडा ता साक्री येथे ग्रामपंचायत चिपलीपाडा व इंजि.मोहन सूर्यवंशी भाजपा मंडळ अध्यक्ष पिंपळनेर यांच्या विद्यमाने आज  २५०० मास्क चे वाटप  भाजपचे मोहन सूर्यवंशी सरपंच रतन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य तापीराम सूर्यवंशी, ग्रामसेवक खैरनार  भाऊसाहेब अंगणवाडी सेविका शोभा सूर्यवंशी, अंजना अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे