Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:27 IST2025-11-21T17:24:18+5:302025-11-21T17:27:34+5:30
Dondaicha Nagar Parishad Election Result 2025: संपूर्ण महाराष्ट्रात नगराध्यक्षपद आणि सर्वच्या सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच नोंद आहे.

Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
Dondaicha Nagar Parishad Election Result: दोंडाईचा नगरपालिकेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपने ही निवडणूक लढवली. नगरपालिका निवडणुकीत २६ पैकी २६ नगरसेवकांना बिनविरोध निवडून आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नगराध्यक्षपद आणि सर्वच्या सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच नोंद आहे. भाजपच्या नयनकुवर रावल या तिसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत.
बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक (प्रभागनिहाय): प्रभाग अ गट, ब गट
१ देवरे मुकेश गणसिंग कुकरेजा रवीना महेश
२ सोनवणे सरलाबाई छोटू शेख शिबान अहमद रियाझ अहमद
३ चव्हाण अक्षय वसंत बागवान सुपियाबी महमूद
४ नगराळे कल्पनाबाई गोपाल पिंजारी शेख नबू शेख बशीर
५ पाटील विजय जिजाबराव मराठे भारती विजय
६ कागणे वैशाली शरद धनगर सुभाष कांतीलाल
७ रामोळे देवयानी संजोग पाटील चतुर जिभाऊ
८ गिरासे नरेंद्रसिंग नथुसिंग अग्रवाल राणी राकेश
९ महाजन वैशाली प्रवीण जाधव निखिलकुमार रवींद्रसिंह
१० चौधरी अपूर्वा चिरंजीवी गिरासे जितेंद्र धनसिंग
११ महाले भावना हितेंद्र देशमुख रवींद्र भास्कर
१२ भिल सरजु वेडु बागुल सुवर्णा युवराज
१३ ठाकूर भरतरी पुंडलिक गिरासे ललिता जितेंद्र
भाजप कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
"ऐतिहासिक बिनविरोध विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. एकमेकांना पेढे खाऊ घालून, घोषणा देत आणि फटाके फोडून हा विजय साजरा करण्यात आला. या जल्लोषामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराचा चेहरामोहरा बदलणार - पालकमंत्री रावल
या यशानंतर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले, "गावाच्या विकासासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि विरोधी गटाने देखील सहकार्य करत अर्ज मागे घेतले. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आगामी काळात दोंडाईचा शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, हे शहर महाराष्ट्रातील विकसित शहर म्हणून नावारूपाला येईल."