शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर येथील संतोषी माता नगरातील जलकुंभाला सुरु करण्याआधीच लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:01 IST

सुमारे ५९ लाख रुपये खर्चून नविन जलकुंभ उभारला, नागरिक संतप्त

मालपूर :- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील संतोषी माता नगरातील नवीन जलकुंभ व पाईप लाईन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़ सुमारे ५९ लाख रुपये खर्चून नविन जलकुंभ उभारला जात असुन त्याला प्रचंड गळती प्रथम दर्शनी दिसुन आल्याने तेथील नागरिक संतप्त दिसुन येत आहेत.मालपूर येथे संतोषी माता नगरात पाणी असुन तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती. हा संपुर्ण भाग उंचावर येत असल्यामुळे येथे पाण्याचा पुरवठा पुर्ण क्षमतेने करता येत नव्हता यासाठी येथे नविन जलकुंभाची मागणी होती. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून सुमारे ५९ लाख रुपयांचा आराखडा मंजुर करुन येथे नवीन जलकुंभाची निर्मिती करण्यात आली़ मात्र सदोष कामाचा अभावामुळे या पाणी टाकिला प्रचंड गळती असल्याचे तेथील नागरिक सांगतात. नागरिकांना पाणी मिळण्याआधीच जलकुंभाला गळती लागत असेल तर यावरुन कामाचा दर्जा वर प्रश्न चिन्ह होत असुन वरिष्ठांनी याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.तसेच या जलकुंभापासुन नविन पाईपलाईन टाकली जात असुन ती देखील चार दिवसांपासून वाद्याच्या भोवºयात सापडल्याने येथील वाहतुकीचा मार्गच अप्रत्यक्ष बंद झाल्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड तारांबळ उडतांना दिसुन येत आहे.संतोषी माता ते राणी काळज हा रस्ता १५ लाख खर्चून जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०१४ साली काँक्रीटीकरण करण्यात आला होता मात्र आता याच मार्गावर जे. सी. बी. च्या साहाय्याने पाईप लाईन टाकण्यासाठी कोरल्याने संपुर्ण पैसे वाया गेल्यात जमा आहे. तसेच पाईपलाईन टाकण्याचा काही ग्रामस्थांचा विरोध असल्याने हे काम सध्या स्थितीत बंद आहे व ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे पाईपलाईन टाकण्याचे काम बंद केले असुन कोरलेली चारी परत बुजणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे यांनी यावेळी सांगितले़ मात्र यामुळे काँक्रीट रस्ताचे नुकसान झाले याचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. रस्ता पुन्हा काँक्रीटकरण करण्याची तेथील नागरिकांना मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे