शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वकीलाचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:56 IST

सुरत बायपास रोडवरील राजदीप सोसायटीतील घटना : कुलूप न तोडता घेतला बनावट चावीचा आधार

धुळे : शहरात चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सुरत बायपास वरील पाचशे क्वॉर्टर जवळील राजदीप सोसायटीतील एका वकीलाचे बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडले. रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली. नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पाचशे क्वॉर्टरच्या बाजूला राजदीप सोसायटी असून त्यात प्लॉट नंबर ५६ मध्ये अ‍ॅड़ विनोद प्रभाकर सोनवणे यांचे वास्तव्य आहे. ते लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घर गाठले. कुलूप न तोडता बनावट चावीने घर उघडले. घरातील संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त केले. बेडरुममधील कपाटातील सर्व साहित्यांचे नुकसान करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन घेतला. चोरी केल्यानंतर पुढील दाराने न जाता पाठीमागून दाराने चोराने काढता पाय घेतला.सकाळी अ‍ॅड़ सोनवणे आपल्या घरी परतले. त्यावेळेस त्यांना आपले घर उघडे दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्यात कळविली. पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वान पथकानेही धाव घेतली. याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचेही पथकाने भेट देवून पाहणी केली.

टॅग्स :Dhuleधुळे