शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांअभावी शाळांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

धुळे : शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांचे शाळेत जंगी स्वागत... मोफत पुस्तकांचे वितरण...त्याचबरोबर दीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिणींची भेट, ...

धुळे : शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांचे शाळेत जंगी स्वागत... मोफत पुस्तकांचे वितरण...त्याचबरोबर दीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिणींची भेट, असा हा दिवस असतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंगळवारपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ॲानलाइन व ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या. शाळेत फक्त शिक्षकच हजर होते. एकही विद्यार्थी आला नव्हता. विद्यार्थ्यांअभावी शाळा व परिसरात शुकशुकाट दिसून आला.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्या होत्या. २०२०-२१ मध्ये जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले नव्हते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर ७ डिसेंबरपासून ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग त्यानंतर २७ जानेवारी २१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते. मात्र, यालाही अल्पसा प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, यावर्षी कोरोनाचा प्रकोप पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयानक असल्याने परीक्षाच झाल्या नाही. त्यामुळे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र, मेअखेरपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावही कमी झाल्याने, अखेर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. दरम्यान, मंगळवारपासून विद्यार्थ्यांविना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्या आहेत.

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करून त्यांचे स्वागग केले जाते. मात्र, यावर्षी ना विद्यार्थ्यांचे स्वागत झाले, ना मोफत पुस्तके मिळाली.

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकच उपस्थित हाेते. शिक्षकांनी शाळा परिसराची स्वच्छता केली. तसेच पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले. याव्यतिरिक्त शाळेच्या पहिल्या दिवशी कुठलेही कामकाज झालेले नाही.

सर आम्ही कोणत्या वर्गात गेलो?

दीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याची माहिती ग्रामीण भागातही पोहोचली होती. त्यामुळे काही भागात सकाळी विद्यार्थी शाळेत आले होते; परंतु या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी घरी पाठविले. दरम्यान, काही ठिकाणी विद्यार्थी व पालकांनी शिक्षकांना अफलातून प्रश्न विचारून बुचळ्यात पाडले होते. एके ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सर आम्ही कोणत्या वर्गात बसायचे, असा प्रश्न विचारला, तर एका ठिकाणी पालकाने परीक्षेविना विद्यार्थी पास कसे झाले? असा प्रश्न विचारल्याने शिक्षकांनाही कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.

मालपूरला शिक्षक हजर, विद्यार्थी खेळण्यात मग्न

मालपूर :- येथील सर्वच शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती आवर्जून दिसून आली मात्र विद्यार्थ्यांशिवाय शाळेचे पटांगण एकूणच वातावरण सुने सुने दिसून आले, तर विद्यार्थी गावातील गल्लीबोळात आपापल्या खेळात मग्न असल्याचे पहावयास मिळाले. मालपूर येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा असून, जिल्हा परिषदेच्या स्वतंत्र तीन शाळा आहेत. माध्यमिक दोन तर इंग्रजी माध्यमाची एक शाळा आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक गावात पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले तर काही शाळा वर विद्यार्थ्यांचा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करणे तसेच कोणकोणत्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही याची वर्गवारी करण्यात येथील शिक्षक व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.

शिरपूरला घरी जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

शिरपूर : शहरातील डॉ. विजयराव व्ही़. रंधे इंग्लिश मेडियम स्कूल येथील शिक्षकांनी विद्यार्थी प्रतिनिधींचे व नवागत विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष घरी जाऊन औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

१५ रोजी शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉक असताना मात्र शाळा अद्यापही लॉक आहेत़ किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ.विजयराव व्ही़ रंधे इंग्लिश मेडियम स्कूल येथील शिक्षकांनी विद्यार्थी प्रतिनिधींचे व नवागत विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष घरी जाऊन औक्षण करून गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आले.

शासन निर्णयानुसार स्वीकारलेल्या पद्धतीचे महत्त्व मनीषा लोखंडे यांनी यावेळी पटवून देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गशिक्षक स्वाती चव्हाण, उमेश राजपूत, मनीषा पटेल, पवित्रा राजपूत आदी उपस्थित होते. शिक्षक अचानक घरी आल्याने पालक, विद्यार्थी देखील भारावून गेले.