शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता रुग्णांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST

जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्याने सुमारे १५ वर्षांपूर्वी दोंडाईचात उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आले. रुग्णालय स्थापनेपासूनच वैद्यकीय अधिकारी ...

जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्याने सुमारे १५ वर्षांपूर्वी दोंडाईचात उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आले. रुग्णालय स्थापनेपासूनच वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आजही मुख्य वैद्यकीय अधीक्षक पद कायमस्वरूपी नाही. या पदासाठी नेहमी रस्सीखेच असते. कायमस्वरूपी पद नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक राहत नाही. काही कर्मचारी इमानदारीने काम करतात, परंतु काही सयाजीराव आजही आहेत. दोडाईचा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने दोंडाईचाकराच्या चिंतेत भर पडत आहे, तर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. अशाही विपरीत परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी काम करीत आहेत. कोरोना महामारीत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार होत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजनयुक्त बेड आहेत. मुख्य वैद्यकीय अधीक्षक पद आजही अस्थिर आहे.

वर्ग दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात पदे आहेत. आज मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. ललितकुमार चंद्रे असून, डॉ. अर्जुन नरोटे, डॉ. अमोल भामरे, डॉ. भूषण काटे असे चारच वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष खोमणे अन्य ठिकाणी कार्यरत आहेत. एकंदरीत फक्त चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयाची मदार आहे.

कोरोना महामारीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता रुग्णांच्या मुळावर येऊ पाहत आहे. शासनाने याबाबत गांभीर्य दाखवून तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच परिचारिका पण महत्त्वपूर्ण आहेत. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात १२ परिचारिका मंजूर असून, ३ परिचारिकांची कमतरता आहे. रक्तपेढी सध्या नावालाच आहे, कारण येथील कर्मचारीसुद्धा कोरोनात कार्यरत आहेत. कोरोनाची बाधा वाढत असताना कोरोना स्वॅब देणे व कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अनेक नागरिकांनी पहिल्यांदाच उपजिल्हा रुग्णालय बघितले आहे.