शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खलाणे ते दराणे रस्त्याच्या कामाचा लोकवर्गणीतून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

खलाणे ते दराणे रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण पायी चालणेसुद्धा अशक्य झाले ...

खलाणे ते दराणे रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण पायी चालणेसुद्धा अशक्य झाले होते. त्यात त्या रस्त्याला खलाणे येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने या शेतकऱ्यांना दररोज शेती कामाकरिता येण्या- जाण्याकरिता मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते.

या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता, हे समजत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून काटेरी झुडपे वळसा घेतल्याने बैलगाडीही नेण्यासाठी कसरत करावी लागत असून शेतीमालही आणता येत नाही. शेतात पाणी देण्याकरिता रात्री व दिवसा मोटारसायकलने जायचे म्हटले तर मोटारसायकल पंक्चर होऊन तशीच लोटून आणावी लागते.

रस्ता नूतनीकरण करण्याकरिता लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला. परंतु, कोणीही लक्ष दिले नसल्याने शेवटी खलाणे येथील ज्येष्ठ शेतकरी यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी हितगुज करून लोकवर्गणीतून या रस्त्याचे काम करण्याचा निश्चय केला आणि लोकवर्गणीतून पैसा गोळा करून या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करून कामाला गती देण्यात आली.

यावेळी उपसरपंच संजय वाल्हे, ज्ञानेश्वर पाटील,गुलाबसिंग गिरासे, तुषार देसले ,संभाजी वाघ, हरिभाऊ ठाकरे ,भैया गिरासे ,भाईजी ईशी, सुनील गिरासे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.