शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

खाकीच्या मदतीला धावली खाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST

मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लागण लागण्यास सुरुवात झाली होती. टप्प्याटप्प्याने सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. ...

मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लागण लागण्यास सुरुवात झाली होती. टप्प्याटप्प्याने सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. बसेस बंद झाल्या, दुकाने बंद करण्यात आली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. शासकीय असो वा खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सर्व बंद होत असताना मात्र पोलीस रस्त्यावर होते. परिणामी रस्त्यावरून फिरणारे असो वा कोणीही त्यांची चौकशी करणे, त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू झाले. शेकडो लोकांवर वर्षभरात गुन्हे दाखल झाले. त्यात विनामास्क असलेल्यांची संख्या बऱ्यापैकी होती. असे चित्र एकीकडे असताना पोलिसांनादेखील कोरोनाची बाधा होण्यास सुरुवात झाली होती. अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार सुरू होऊन ते पुन्हा आपल्या कामावर रुजू देखील झाले आहेत. दोन ते तीन जणांचा यात मृत्यूदेखील झाला आहे. अशी स्थिती वर्षभर कमी-अधिक प्रमाणावर होती. आता पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही त्रास झाल्यास आणि त्यांना रुग्णालयात बेड मिळाला नाही तर असा दूरदृष्टिकोन ठेवून पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पुढाकार घेवून पोलीस मुख्यालयात पोलिसांसाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे.

चौकट.......

पोलीस मुख्यालयात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पाहणी केली आहे. याठिकाणी बेडची व्यवस्था नीट आहे की नाही, डॉक्टर उपलब्ध आहेत का, त्यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री मिळत आहे का, पोलिसांना काही त्रास आहे का, यासह अनेक बारीकसारीक बाबींचा परामर्श घेतला जात आहे.