शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जावयाने केला सासऱ्याच्या भाच्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

धुळे : काैटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याच्या भाच्याचा विळ्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना धुळे तालुक्यातील जापी शिवारात ...

धुळे : काैटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याच्या भाच्याचा विळ्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना धुळे तालुक्यातील जापी शिवारात बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. सासरचे नातेवाईक पत्नीचे दुसरीकडे लग्न लावून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय आल्याने पतीने हा खून केला. जापी शिवारात कापडणे पाटचारी लगत युवराज निंबा ठाकरे यांच्या शेतात हा खून झाला. राजेंद्र रामसिंग बारेला (३२, रा. चाळीसगाव जि. जळगाव) असे मयताचे नाव असून, काशिराम चिखल बारेला-पावरा (रा. हटवाडी, पानसेेमल, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

धुळे तालुक्यातील वणी येथे राहणाऱ्या केवलसिंह पावरा याच्या लहान मुलीचे शनिवारी लग्न होते. या लग्नासाठी केवलसिंहचे भाऊ, बहीण, भाचे, नातेवाईक तसेच मोठा जावई काशिराम पावरा असे सर्व नातेवाईक आले होते. लग्न झाल्यानंतर काशिराम निघून गेला. परंतु तो रविवारी पुन्हा परत आला आणि जापी शिवारात केवलसिंहच्या भावाकडे मुक्कामी थांबला. काशिराम पावरा वादविवाद करीत असल्याने केवलसिंह वणीला परत गेला. दरम्यान, बुधवारी सकाळी काशिरामला घेण्यासाठी केवलसिंहचा मुलगा आणि चाळीसगाव येथील भाचा राजेंद्र रामसिंह बारेला हे दोघे आले होते. तिघे जण पायी जात असताना जापी ते बिलाडी रोडवर त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी काशिराम पावरा याने दोघांवर हल्ला करून विळ्याने वार केले. त्यात मानेवर आणि पोटात विळा घुसल्याने राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. केवलसिंहचा मुलगा सुटका करण्यात यशस्वी झाल्याने तो बचावला. त्यानंतर मारेकरी काशिराम पावरा फरार झाला.

दरम्यान, या गुन्ह्याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शोखचे प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, पोलीस पाटील मनोज गुजर आदी घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. पोलिसांनी अवघ्या काही वेळेतच मारेकरी काशिराम पावरा याला अटक केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.