शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीत 363 जणांना कोरोना संर्सग, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:32 IST

धुळे : जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३६३ ...

धुळे : जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३६३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना या महिन्यात मृत्यू झाला आहे.बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी रुग्ण आढळणे सुरूच आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या १०८ रुग्णांवर उपचार सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आहे. २९ जानेवारी रोजी साक्री तालुका कोरोनामुक्त झाला होता. तालुक्यात एकही बाधित रुग्ण नव्हता, मात्र ३० जानेवारी रोजी तालुक्यातील एका व्यक्तीचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाल्याचा आनंद फार काळ राहू शकला नाही.आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८२६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४ हजार ३४४ जण बरे झाले आहेत तर ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील सर्वाधिक १७३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तसेच धुळे तालुक्यातील ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून धुळे तालुक्याचा मृत्युदर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. तालुक्याचा ४ टक्क्यांपेक्षा अधिक मृत्युदर आहे. शिरपूर तालुक्यातील ६७, शिंदखेडा ४५ व साक्री तालुक्यातील ३१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.५८ रुग्णांना लक्षणे नाहीतसध्या उपचार घेत असलेल्या १०८ रुग्णांपैकी ५८ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. २४ रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. १९ जणांना मध्यम तर ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयात १४ व इतर जिल्ह्यात ३ जण उपचार घेत आहेत. तर ७६ जण गृह विलगीकरणात आहेत.१०८ रुग्णांवर उपचार१०८ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यात धुळे शहरातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील २४ कोरोना बाधित रुग्ण आहेत.साक्री तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक जण कोरोना बाधित रुग्ण आहे. शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ५ बाधित रुग्ण आहेत. साक्री व शिरपूर तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापूर्वीही कमी झाली होती. मात्र त्याठिकाणी पुन्हा रुग्ण आढळले होते.