शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तामथरे येथील शाळा खोली बांधकामाचा मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:09 IST

जिल्हा परिषदेची स्थायी सभा : गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सीईओंचे आदेश

धुळे : तामथरे (ता.शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळा खोली बांधकामात झालेल्या अपहार प्रकरणाचा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला. अपहार प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यास उशीर करणाºया गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी असे आदेश मुख्याधिकारी वान्मथी सी. यांनी आज दिले.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा डॉ. तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात ही सभा झाली. व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुम निकम, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामकृष्ण खलाणे, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी उपस्थित होते.सभेत चिमठाणे गटाचे सदस्य विरेंद्र गिरासे यांनी तामथरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामच्या अपहाराचा मुद्दा उपस्थित केला. संबधीत शिक्षकाला निलंबित केले नाही, गुन्हा दाखल करण्यास उशीर केला अशी बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.यावर उत्तर देतांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनिष पवार म्हणाले की, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाकडून रक्कम वसुल करण्यात येणार होती. मात्र ती झालेली नाही.दरम्यान वान्मथी सी. म्हणाल्या, हा प्रकार गंभीर आहे. संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले.सभेत आरोग्य विभागाचा मुद्दाही गाजला. सदस्य पोपटराव सोनवणे यांनी जिल्ह्यातील भरारी पथकांतील अधिकारी व त्यांच्या वाहनांची माहिती विचारणा केली.त्यावर आरोग्य अधिकाºयांनी जिल्ह्यात १६ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांना वाहनांची निविदा प्रक्रीया सुरु असल्याची माहिती दिली. त्यावर आक्षेप घेत, सोनवणे यांनी काळ्यायादीतील ठेकेदाराला ही निवीदा देण्यात आल्याचा आरोप केला.तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी केली.

टॅग्स :Dhuleधुळे