शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:09 IST

मौजे कुसुंबा येथील ग्रामस्थांची मागणी : जिल्हा प्रशासन, जि.प. अधिकाऱ्यांना दिले निवेदन

धुळे : तालुक्यातील मौजे कुसुंबा येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्यात येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. हा प्रश्न येत्या ४-५ दिवसात न सुटल्यास ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करतील असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कुसुंबा येथे २००६-०७ मध्ये नवीन पाईप लाईन नळ पाणी पुरवठा योजना सुमारे ७० लाख रूपये करून करण्यात आली. नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी व राबविण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली नाही. ही योजना मंजूर करण्यासाठी बनावट ठराव करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कुसुंबा गावाची रचना चौरस पद्धतीने अभियंता सर विश्वेश्वरैय्या यांनी आखणी केलेली आहे. गावात सात गल्ल्या आहेत.नवीन नळ पाणी पुरवठा योजना गावाच्या पुढील गल्लीतून करणे योग्य नव्हते. तांत्रिकदृट्या चुकीच्या पद्धतीने ही पाईपलाइन केलेली आहे. ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटून पाणी वाहून जाते. तसेच बांधलेला जलकुंभ १२ वर्षांपासून रिकामा आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या गावात दहा दिवसानंतर पाणी येत आहे. दुष्काळीस्थितीत नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत असल्याने, गावातील ग्रामस्थांना पूरेसे पाणी मिळत नाही.जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने गावात येऊन या योजनेची पहाणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून, निवेदन प्रशासनाला निवेदन दिले.निवेदनावर जयश्री पवार, रत्ना परदेशी, सुरेखा पवार, मंदाबाई परदेशी, अनिता परदेशी, रेणुकाबाई परदेशी, यमुनाबाई परदेशी, कुसुमबाई परदेशी, शुभांगी परदेशी, सुनीता परदेशी, मंगलाबाई परदेशी, मीराबाई परदेशी यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे