शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जैन सोशल ग्रुपला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:10 IST

उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल गाैरव

धुळे : सन १९६५ साली निस्वार्थ सामाजिक सेवेच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा ‘जेएसजी ग्लोरी अवार्ड’ शनिवारी राजस्थानातील कोटा येथे पार पडला. धुळ्याच्या जैन सोशल ग्रुपला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देवून कार्याचा गाैरव करण्यात आला.विश्व बंधुत्वाचे कार्य करत परस्पर प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या आणि अतिविशिष्ठ सेवाकार्यात अग्रेसर असणाऱ्या ग्रुपला दर दोन वर्षात हा मानाचा पुरस्कार दिला जातो.१७ हून अधिक देशांमधल्या, भारतातील १४ हून अधिका राज्यांमधल्या ४०० हून अधिक ग्रुप आणि ७५ हजारहून अधिक सभासद असलेल्या जैन सोशल गृप आंतरराष्ट्रीय फेडरेशनव्दारे यंदा १४० ग्रुपमधून २३६ प्रवेशिकांपैकी धुळे येथील जैन सोशल ग्रुप यांचा ‘बेस्ट गृप, बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट सेक्रेटरी, आणि बेस्ट युवा फोरम प्रेसिडेंट’ अशा चार पुरस्कारांसाठी धुळे सेंटरचे अंतिम नामांकन केले गेले. हि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.दोन वर्षाच्या कार्यकाळात जैन सोशल गृप धुळेतर्फे अनेक समाजोपयोगी कार्य करण्यात आले आहेत. कोरोना काळात डाॅक्टर आपल्या दारी उपक्रमातून औषधे, सॅनिटायझर यासह वैद्यकीय सुविधेचे मदतकार्य केले. १०८ पेक्षा अधिक कार्यामध्ये सेवा बजावली आहे. या कार्यांची दखल, जेएसजी आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या पुरस्कार वितरण समितीमार्फत घेतली गेली आणि धुळे सेंटरला ‘बेस्ट ग्रुप’ चा पुरस्कार तसेच तेजस शामसुखा यांना ‘बेस्ट युवा फोरम प्रेसिडेंट’ पुरस्कार गुणवत्तेच्या आधारावर देऊन गौरविण्यात आले.यावेळी जैन सोशल गृप इंटरनॅशनल फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कमलकिशोर संचेती, सेक्रेटरी जनरल बिरेनभाई शहा, महाराष्ट्र रिजन अध्यक्ष राजेंद्र धोका व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, राजस्थान प्रशासकिय सेवेतील उच्च अधिकारी आयएएस आर.डी. मीना, पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष अनिल काला, राजकुमार जैन, कोटा लोकल सेंटरचे अध्यक्ष पंकज सेठी, सचिव अनुराग जैन आदि उपस्थित होते.जगभरात अस्तित्व असणाऱ्या संस्थेच्या पुरस्कार वितरणात धुळ्याचा समावेश असल्याबद्दल तसेच केलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल जैन सोशल गृप, धुळे चे संस्थापक अध्यक्ष हरीश चोरडिया, अध्यक्ष नीलेश रुणवाल, सचिव वर्धमान सिंगवी तसेच युवा फोरम अध्यक्ष तेजस शामसुखा यांसह संपूर्ण कार्यकारी मंडळाचे विविध स्तरातून अभिनंदन होत      आहे.

टॅग्स :Dhuleधुळे