शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:10 IST

१७ गावांना १४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा : उपाययोजनांची वाढती मागणी

ठळक मुद्देपुरेशा पावसाअभावी यंदा टंचाईची झळ अधिकशिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक ११ टॅँकर धुळे तालुक्यात फागण्यासह तीन गावांना टॅँकरने पाणीपुरवठा 

लोकमत आॅनलाईनधुळे : गेल्या आठवड्याभरात तापमानाचा पारा वाढू लागताच जिल्ह्यात टंचाईची तीव्रताही वाढली असून उपाययोजनांची मागणीही होऊ लागली आहे जिल्ह्यात सद्यस्थितीत धुळे व शिंदखेडा या दोन तालुक्यात मिळून एकूण १७ गावांना १४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच अधिग्रहित केलेल्या खाजगी विहिरींची संख्याही वाढत चालली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धुळे, शिंदखेडा तालुक्यात गंभीर दुष्काळ तर शिरपूर तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झालेला आहे.  साक्री तालुक्यातही दोन महसुली मंडळे वगळता उर्वरीत सर्व मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईच्या तीव्रतेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.शिंदखेडा तालुक्यात टंचाईची सर्वाधिक झळजिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यास दुष्काळाचा मोठा फटका बसत असून टंचाईची सर्वाधिक झळ या तालुक्यातील गावांना बसत आहे. तेथे गेल्या पावसाळ्यापासून सात ते आठ गावांना पाणीपुरवठ्यासाठी टॅँकर सुरू आहे. त्यात पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व आता उन्हाळ्यात भर पडत चालली आहे. सद्यस्थितीत या तालुक्यात तब्बल १४ गावांना ११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात वरूळ घुसरे, चुडाणे, विखरण, सोनशेलू, रहिमपुरे, कामपूर, झिरवे, विटाई, दत्ताणे, अजंदे, मेलाणे, डाबली, निशाणे व भडणे या गावांचा समावेश आहे. या शिवाय अन्य गावांसाठी खाजगी विहिरीही अधिग्रहित करण्यात येत आहेत. सध्या तापमानात वाढ झाल्याने अनेक गावांकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. धुळे तालुक्यात तीन टॅँकर सुरू जिल्ह्यात शिंदखेड्यानंतर धुळे तालुक्यातही मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. सध्या फागणे, वडजाई व कुंडाणे (वेल्हाणे) या तीन गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आवर्तनासाठी आंदोलने धुळे व साक्री तालुक्यातील धरणांमध्ये अद्याप बºयापैकी साठा आहे. मात्र तो जुलैअखेर पुरविण्याचे नियोजन आहे. मात्र टंचाईने त्रस्त ग्रामस्थांकडून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली जात असून त्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला जात आहे 

 

टॅग्स :Dhuleधुळे