जिल्हा परिषदेत वर्दळ अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST2021-02-26T04:49:51+5:302021-02-26T04:49:51+5:30

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून कोराेना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळ सुरू झाली. एवढेच नाही तर सर्वसाधारण सभा, ...

The hustle and bustle in the Zilla Parishad still persists | जिल्हा परिषदेत वर्दळ अजूनही कायम

जिल्हा परिषदेत वर्दळ अजूनही कायम

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून कोराेना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळ सुरू झाली. एवढेच नाही तर सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभाही ॲाफलाइन होऊ लागली; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलेला असताना जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत मात्र येणाऱ्यांची वर्दळ अजूनही कायम आहे. अनेक जण तर मास्क न लावताच येतात. शिवाय येथे येणाऱ्यांचे तापमान मोजण्याचीही कुठलीही व्यवस्था नाही. चुकून एखादा बाधित आला तर त्याची लागण त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरून येणाऱ्या- जाणाऱ्यांवर अद्याप कुठलेच निर्बंध न घातल्याने, कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्येही थोडे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात यावे, अशी अपेक्षा काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.

Web Title: The hustle and bustle in the Zilla Parishad still persists