शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादनाचा खर्च जास्त भाव कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST

बियाणात फसवणूक झाली उघड यंदा उन्हाळ कांदा बियाण्यांचा मोठा तुटवडा होता. त्याचा गैरफायदा बनावट कंपन्यांनी घेतला. तब्बल ५ हजारांवर ...

बियाणात फसवणूक झाली उघड

यंदा उन्हाळ कांदा बियाण्यांचा मोठा तुटवडा होता. त्याचा गैरफायदा बनावट कंपन्यांनी घेतला. तब्बल ५ हजारांवर अधिक भावाने शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. हे बियाणे खरेदी केले उन्हाळ कांद्याचे अन् निघाले खरिपाचे यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा माल साठवणूक करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर बहुतांश शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विक्री करावा लागत आहे. काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. जे उगले त्या कांद्याला डेंगळे आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

निर्यात महत्त्वाची

कांदा बाजारपेठेला निर्यात महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजारपेठेतील बाजारभाव दररोज अपडेट मोबाइलवर मेसेज करून निर्यातीकडे लक्ष द्यावे. भाव घसरणार नाही. याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी आहे. स्थानिक बाजारपेठ यासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. म्हसदी, देऊर, नेर, कुसुंबासह मोराणे प्र. ल. येथे थेट ओपन ट्राॅली कांदा खरेदी करायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्यातच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. जेथे भाव जास्त तेथे शेतकरी कांदा विक्री करतील.

भाव घसरणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणूक करण्याकडे लक्ष दिले आहे. तसे नियोजन सुरू आहे.

बांधावर थेट खरेदी

बहुतांश व्यापारी यंदा बांधावर थेट कांदा खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यापारांनी संपर्क वाढवला आहे. एजंटमार्फत निरोप दिले जात आहे. एकंदरीत स्पर्धेत भाव मिळावेत हीच अपेक्षा कुसुंबा. नेर, देऊर, म्हसदी, अकलाड मोराणे, चौगाव गोताणे आनंदखेडे, उडाणे, मेहरगाव, कावठी आदी परिसरांतील शेतकर्‍यांची मागणी आहे.