शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST

ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. या आरोग्य केंद्रामध्ये ...

ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. या आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसह कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात येते. मात्र, मोडकळीस आलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीतून आरोग्य सुविधा पुरवण्यात अडचणी येतात. जिल्ह्यातील मालपूर व विखरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीस आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पाडून ती नव्याने बांधणे आवश्यक आहे. बोरकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय मेथी, अमराळे, जोगशेलू, विरदेल, चिरणे, शेवाडे, सुभाषनगर, भाटपुरा, हिसाळे उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या इमारतीसह कर्मचारी निवासस्थान व संरक्षण भिंतीचे काम करण्याची आवश्यकता आहे. बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार मोडकळीस आलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारती पाडून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहेत. हा विषय जिल्हा परिषदेची आरोग्य समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. आता आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचे बांधकाम व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामांना चालना मिळेल.

जिल्ह्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र, सात उपकेंद्रांचे काम; निवासस्थानांचेही बांधकाम

जिल्ह्यातील नऊ आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यात बोरकुंड येथील आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत आणि दुरुस्ती, वालखेडा येथे अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम तसेच चार खाटांची नवीन इमारत, मुख्य इमारत दुरुस्ती, मुकटी, शिरुड, धमाणे येथे चार खाटांची इमारत तर निमगूळ, लामकानी येथील केंद्रात दुरुस्ती करण्यात येणार आहे. बळसाणे, वर्धाने, दुसाणे उपकेंद्राच्या आवाराची दुरुस्ती आणि संरक्षण भिंतीचे काम केले जाणार आहे. आढे, खंबाळे, मांजरोद, पिंजारझाडी येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कार्यारंभ आदेश देण्यात येतील.

या उपकेंद्रांचे होणार स्थलांतर : दहा गावांचा पालिकेच्या हद्दीत समावेश झाला. या गावांमध्ये सुरू असलेले उपकेंद्र आता इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात मोराणे येथील उपकेंद्र वार येथे, वरखेडी येथील उपकेंद्र जापी, बाळापूर येथील उपकेंद्र काळखेडा येथील स्थलांतरित हाेणार आहे. जि.प. आरोग्य समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर स्थलांतराचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या सहसंचालकाकडे पाठवला आहे.