शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

वाळु चाेरांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:45 IST

पथके कार्यरत : तहसिलदरांनी पकडले वाळुचे डंपर

धुळे :  पांझरा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर आता महसूल प्रशासनाची करडी नजर आहे. गाैण खनिजाची चोरी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके कार्यरत झाली आहेत. धुळे शहर अपर तहसिलदार संजय शिंदे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी वाळूचे डंपर पकडून दंडात्मक कारवाई केली.अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशानुसार तहसिल कार्यालयांच्या स्तरावर पथके तयार केली आहेत. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय पथक देखील तयार केले आहे. दरम्यान, अपर तहसिलदार संजय शिंदे यांच्या पथकाने गाेंदूर राेडवर सकाळी साहेसहा वाजता वाळूचे डंपर पकडले. सदर वाहन जप्त करून अपर तहसिलदार कार्यालयात आणले आहे. याप्रकरणी संबंधितांला दंडात्क वसुलीची नाेटीस बजावली आहे. दीड लाखांपर्यंत दंडाची वसुली केली जाणार आहे, अशी माहिती तहसिलदारांनी दिली.पांझरा नदी पात्रात माेठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी तहसिलदारांच्या पथकाने शहरातील विविध रस्त्यांवर फेरफटका मारण्याचे मोहिम हाती घेतली आहे. या दरम्यान शुक्रवारी गोंदूर रोडवर वाळूच डंपर जात असल्याचे दिसले. त्यात दीड ब्रास वाळू हाेती.कारवाई करणाऱ्या पथकात मंडळ अधिकारी आर. पी. कुमावत, नगांवचे मंडळाधिकारी सी. ओ. पाटील, फागणे तलाठी बाविस्कर, नगांव तलाठी माळी, चिताेड तलाठी चाैधरी, कुंडाणेचे महाजन यांचा समावेश हाेता.धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयाच्या हद्दीत पांझरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. नकाने रोडने रात्रभर शंभर ते दोनशे वाळूची वाहने पास होत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण तहसिलदारांच्या पथकाने पंधरा दिवसांपूर्वी मध्यरात्री मोठी कारवाई केली होती. परंतु त्यात सातत्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजी वाळू उपसा सर्रासपणे सुरूच आहे. धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयाने कारवाईबाबत चांगला धडका घेतला होता. त्यात सातत्य ठेवले तर पांझरा नदीतील वाळू सुरक्षित राहू शकते असे नदीकाठच्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नेर, कुसूंब्यापासून नकाने रोडने रात्रभर अवजड वाळू वाहनांचा ताफा सुरू राहतो. त्यामुळे रस्त्याची देखील दुरावस्था होत असल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महसूल विभागाने येथील वाळू उपशाकडे लक्ष देण्याची गरज आहे. बोरकुंड ता. धुळे परिसरात देखील वाळू माफियांनी उच्छाद मांडल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे