आजोबाच्या खूनप्रकरणातील नातवला बुधवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST2021-03-22T04:32:52+5:302021-03-22T04:32:52+5:30

धुळे तालुक्यातील वार येथील ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याचे आजोबा भाईदास उखडू पारधी यांचा २००६ मध्ये खून झाला होता. ...

The grandson of the grandfather's murder case was remanded in police custody till Wednesday | आजोबाच्या खूनप्रकरणातील नातवला बुधवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

आजोबाच्या खूनप्रकरणातील नातवला बुधवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

धुळे तालुक्यातील वार येथील ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याचे आजोबा भाईदास उखडू पारधी यांचा २००६ मध्ये खून झाला होता. या खुनामागे त्याचे चुलत आजोबा आत्माराम हिरामण पारधी यांचा हात होता असा संशय ज्ञानेश्वर याच्या मनात असल्याने त्याचा बदला म्हणून ज्ञानेश्वर पवार याने त्याचे आजोबा आत्माराम पारधी (७०) यांचा धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केल्याचे पोलीस तपासातून समोर आले़ शुक्रवारी सकाळी ज्ञानेश्वर हा नेहमीप्रमाणे त्याच्या आजीकडे आला. त्यावेळी ज्ञानेश्वरने कुरापत काढून आजोबा आत्माराम पारधी यांच्याशी वाद घातला. यादरम्यान संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरने धारदार शस्त्राने आत्माराम पारधी यांच्या डोक्यावर, हातावर, बोटावर सपासप वार केले. यात आत्माराम हे रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले होते़ रक्तस्राव अधिक झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित तरुण ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) हा फरार झाला होता. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात शांताराम आत्माराम पारधी यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर पवार (पारधी) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे़

Web Title: The grandson of the grandfather's murder case was remanded in police custody till Wednesday