शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात कोयता घालत नातूकडून आजोबाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 16:46 IST

धुळे तालुक्यातील वार येथील घटना, फरार नातूचा पोलिसांकडून शोध सुरु

धुळे : जून्या वादातून चुलत नातुने आजोबांच्या डोक्यात कोयता घालून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. घटनेनंतर नातू फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मात्र वार ग्रामस्थ सुन्न झाले होते. दरम्यान, फरार झालेल्या नातूचा पोलीस शोध घेत आहेत.धुळे तालुक्यातील वार येथे आत्माराम हिरामण पारधी (६८) हे पत्नी आणि चार मुले व चार सुना यांच्यासह राहतात. गावात त्यांच्या घराजवळ त्यांचा चुलत नातू ज्ञानेश्वर पवार - पारधी राहतो. आत्माराम पारधी यांच्या शेजारीच ज्ञानेश्वरच्या आजीचे घर आहे. त्यामुळे त्याचे तेथे नेहमी येणे-जाणे असायचे.शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे आजीकडे आला. त्यावेळी ज्ञानेश्वरीने कौटुंबिक वादाची कुरापत काढून शेजारीच असलेल्या आत्माराम पारधी यांच्याशी वाद घातला. यावेळी संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरने आपल्या हातातील कोयत्याने थेट आत्माराम पारधी यांच्या डोक्यावर वार केले. यामुळे आत्माराम हे गंभीर दुखापती होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले.रक्तश्राव अधिक झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचेही पथक दाखल झाले. घटनास्थळी सरपंच दिलीप गिरासे, उपसरपंच निंबा अहिरे, पोलीस पाटील किशोर वाघ उपस्थित होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून संशयित ज्ञानेश्वर पवार - पारधी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो फरार झाला असल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे