शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दहिवद गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 21:56 IST

हाणामारी झाल्याने तणाव : परस्पर विरोधी फिर्याद, १७ जणांविरुध्द गुन्हा

धुळे : ग्रामपंचायत निवडणुकीची कुरापत काढून दोन गट आमने-सामने भिडल्याने हाणामारी झाली. हा प्रकार शिरपूर तालुक्यातील दहिवद गावात शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.पहिल्या गटाकडून विठाबाई जगन्नाथ पाटील (६०, रा. दहिवद, ता. शिरपूर) या वृद्ध महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादाची कुरापत काढून उत्तम जगन्नाथ पाटील आणि किशोर उत्तम पाटील यांना जमावाने एकत्र येऊन शिवीगाळ करीत मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुपारी पावणे दोन वाजता शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रवींद्र संतोष पाटील, ताराचंद पिरन पाटील, दिनेश ताराचंद पाटील, विलास ताराचंद पाटील, प्रकाश रामभाऊ पाटील, रोहित रवींद्र पाटील, कृष्णा रवींद्र पाटील, आशाबाई रवींद्र पाटील (सर्व रा. दहिवद, ता. शिरपूर) यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख घटनेचा तपास करीत आहेत.दुसऱ्या गटाकडून आशाबाई रवींद्र पाटील (३९, रा. दहिवद, ता. शिरपूर) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ग्रामपंचायत निवडणुकीची कुरापत काढून जमावाने एकत्र येत शिवीगाळ केली. हाताबुक्क्याने मारहाण केली. दहशत निर्माण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी दुपारी साडेचार वाजता फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, चुनीलाल जगन्नाथ पाटील, किशोर जगन्नाथ पाटील, उत्तम जगन्नाथ पाटील, जितेंद्र काशिनाथ पाटील, विठाबाई जगन्नाथ पाटील, वैशाली चुनीलाल पाटील, नवनीत काशिनाथ पाटील, भावना उत्तम पाटील, शीतल किशोर पाटील (सर्व रा. दहिवद, ता. शिरपूर) यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३, १४३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पाटील करीत आहेत.