शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर मस्ती, जान नही सस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:20 IST

संतप्त प्रतिक्रीया । ट्रकच्या टपावर बसून धोकेदायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा/नेर : सुरत-नागपूर या राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ वर अवैध प्रवासी वाहतूक नित्याचीच बाब बनली आहे. ट्रकमध्ये व ट्रकच्या कॅबीनवर बसून नागरिक जीवघेणा प्रवास करताना दिसून येत आहेत. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कुसुंबा गावातून सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. या महामार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. या महामार्गावर नेहमीच धोकेदायक वाहतूक सुरु असल्याचे दिसून येते. यामुळे अनेकदा येथे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.एकिकडे शासन वाहन चालकांसाठी विविध नियम घालून देत आहे. सुरक्षित प्रवासाबद्दल विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून चक्क ट्रकच्या टपावरच प्रवासी बसवून प्रवास सुरु असल्याचे दिसून येत आहे. हा प्रवास जीवघेणा ठरु शकतो, याचे वाहन चालकांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रवाशांनाही स्वत:च्या जीवाची पर्वा नसल्याचे यातून दिसून येत आहे. संबंधित विभागाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.नेरला दुचाकीस्वारांची स्टंटबाजीनेर गावातील मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणांकडून स्टंटबाजी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुर्घटना घडू शकते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धुमस्टाईल वेगाने वाहने चालविणाºया दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.गावातील काही टवाळखोर तरुण सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री १० वाजेपर्यंत भरधाव वेगाने दुचाकी वाहने चालवतात. लहान बालके, ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने जोरजोरात हॉर्न वाजवून टवाळी करीत असल्याचे दिसून येत आहे. गावात सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने अशा वाहनांची नोंद घेता होत नाही. गावातील मुख्य रस्त्यावर बेजाबबदारपणे वाहने चालवून नागरिकांना अडथळा निर्माण केला जात आहे. यातून अनेकदा ज्येष्ठांनी याबाबत जाब विचारल्यास तरुणांकडून उद्धटपणे उत्तरे मिळतात. तुमच्याकडून जे होईल ते करा, असे म्हणण्याइतपत या तरुणांची हिंमत धजावली आहे. दुचाकीस्वारांच्या या स्टंटबाजीमुळे लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे वेळीच या तरुणांना आवर घालण्याची गरज असून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे