फ्रेंडशिप डे - जागतिक मैत्री दिवस शहरात उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:23 IST2019-08-04T22:22:33+5:302019-08-04T22:23:15+5:30

भेट वस्तू, फ्रेंडशिप बँडला मागणी: तरूणांसह शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये मैत्र भावनेचा जागर

Friendship Day - World Friendship Day cheers in the city | फ्रेंडशिप डे - जागतिक मैत्री दिवस शहरात उत्साहात 

फ्रेंडशिप डे अर्थात जागतिक मैत्र दिवसाच्या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना फ्रेंडशिप बेल्ट बांधत मैत्री दिवस साजरा केला़ 

धुळे : दरवर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाणारा फ्रेंडशिप डे काल ४ रोजी शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ 
     फ्रेंडशिप बँड बांधण्यासह विविध आकर्षक भेटवस्तू, चॉकलेट्स, टेडीबेअर, ग्रीटिंग्जची वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात तरुणाईची वर्दळ वाढली होती. मैत्री दिवसाचे औचित्य साधत शहरातील तरुणाईत विशेष उत्साह दिसून आला   जोरदार पाऊस व रविवारची सुटी या निम्मिताने तरुण मुले घोळक्याने आपल्या मित्रांसावे फ्रेंडशिप डे साजरा करताना दिसून आले. परिसरातील पर्यटन स्थळांना गर्दी केली होती. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात फ्रेंडशिप डेचं महत्त्वंही वाढलंय.
     * फ्रेंडशिप डे चा इतिहास़़*
 हा खास दिवस दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये खूप वर्षांपासून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. १९५८ साली पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यास सुरुवात केली. 

Web Title: Friendship Day - World Friendship Day cheers in the city

टॅग्स :Dhuleधुळे