शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयात मोफत तर खाजगीमध्ये २५० रुपयांत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST

केंद्र शासनाने तिसऱ्या टप्प्यातील काेरोना लस आता सरकारी व खाजगी रुग्णालयांत उपलब्ध करून दिली आहे. त्यात आयुष्यमान भारतशी संलग्न ...

केंद्र शासनाने तिसऱ्या टप्प्यातील काेरोना लस आता सरकारी व खाजगी रुग्णालयांत उपलब्ध करून दिली आहे. त्यात आयुष्यमान भारतशी संलग्न असलेल्या महानगरातील १४ हॉस्पिटल, सरकारी नऊ रुग्णालयांत कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कोविन ॲपबाबत युझरनेम आणि पासवर्ड खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. खासगी हॉस्पिटलमधील प्रत्येक डोसची किंमत २५० रुपये असणार आहे. ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येईल, तसेच ४५ ते ५९ वयोगटांतील आजार असलेल्यांनाही लस दिली जाईल.

सरकारी रुग्णालये

१) जिल्हा रुग्णालय

२) दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय

३) शिरपूर रुग्णालय

४) शिंदखेडा रुग्णालय

५) साक्री रुग्णालय

६) महापालिकेतील काही रुग्णालये अशा काही सरकारी रुग्णालयांत शासनाकडून कोरोनाची लस देेेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

खाजगी रुग्णालये

१) एसीपीएम

२) खान्देश

३) भतवाल

४) केशरानंद

५) सेवा हाॅस्पिटल

६) ओम हाॅस्पिटल

७) इन्स्टिट्यूट युरोलाॅजी, साक्री रोड

८) चंद्रकांत केले मेडिकल काॅलेज

९) श्री विघ्नहर्ता हाॅस्पिटल

१०) देवरे ११) सिद्धेश्वर १२) सुधा हेल्थ केअर १३) देसले हाॅस्पिटल साक्री रोड १४) सुमालती हाॅस्पिटल साक्रीरोड, धुळे

६० वर्षांवरील नागरिकांना करावी लागेल नोंदणी

६० वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. यासाठी ॲप तयार केले आहे. या ॲपवर लसीकरण करणाऱ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.

पहिल्या टप्प्यातील साडेतीन हजार बाकी

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविकांना कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात काही व्याधीग्रस्त, गरोदर महिला तसेच अन्य काहींनी लस घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना लस देणे बाकी आहे.