शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे आमिष दाखवून केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 22:40 IST

१ लाख ६४ हजारांचा फटका : दिल्लीच्या सहा जणांनी धुळ्यात एकाला गंडविले, गुन्हा नोंद

धुळे : आॅनलाईन पध्दतीने बँकेत पैसे भरुन १ ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्याचे आमिष दाखवून दिल्ली येथील सहा जणांनी धुळ्यातील तरुणाला १ लाख ६४ हजार ४०० रुपयांत गंडविल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ देवपुरातील प्रोफेसर कॉलनीत राहणारा मनोज तुकाराम पाटील याने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, शहरातील गल्ली नंबर ५ मधील महापालिका शाळा क्रमांक ९ जवळ नाकोडा कॉम्प्लेक्स आहे़ या ठिकाणी मनोज पाटील यांचे कार्यालय आहे़ दिल्ली येथील अमन गुप्ता याने फोन करुन न्यू दिल्ली येथून आपल्याला एक लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल, असे आमिष दाखविले़ त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड असे काही महत्वाची कागदपत्रे मागवून घेतली़ त्यानंतर मनोज पाटील यांचा विश्वास संपादन करुन घेत कट कारस्थान रचून आॅनलाईन पैसे बँकेत टाकण्यास भाग पाडले़ परिणामी १ लाख ६४ हजार ६०० रुपये टाकून देखील उपयोग झाला नाही़ हा प्रकार ४ ते ७ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत घडला़ आपण लुटले गेल्याची कल्पना आल्यानंतर मनोज पाटील यांनी आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्याद दिली़ त्यानुसार दिल्ली येथील रहिवासी अमन गुप्ता, टिंकू कुमार, प्रमोद, लाडली बानो, दिपीका शर्मा, सुरेश मेहता (कोणाचेही पूर्ण नाव माहिती नाही) या संशयितांविरुध्द भादंवि कलम ४०६, ४२०, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील तपास सुरु आहे़दरम्यान, फसवणूक करणारे नेमके कोण? याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी