चार विस्तार अधिका:यांची चौकशी

By Admin | Updated: March 17, 2017 00:23 IST2017-03-17T00:23:06+5:302017-03-17T00:23:06+5:30

ग्रामसेवकांनी केलेल्या अपहाराच्या चौकशीस टाळाटाळ

Four Expansion Officers: Inquiry | चार विस्तार अधिका:यांची चौकशी

चार विस्तार अधिका:यांची चौकशी

धुळे : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी केलेल्या अपहार प्रकरणाचा निपटारा वेळेत पूर्ण केला नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील चार विस्तार अधिका:यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
यासंबंधीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आह़े दरम्यान, 56 ग्रामसेवकांवर यापूर्वीच कारवाई झालेली आह़े संबंधित ग्रामसेवकांच्या चौकशीची आणि रक्कम वसूल करण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायत विभागाने घेतली आहे.  यात 49 लाखांची वसुलीही केली आह़े
चौकशीत यांचा समावेश
साक्रीचे बी़एऩ पाटील, ए़पी़ महाले, शिंदखेडय़ाचे पी़क़ेसावंत आणि धुळ्याचे क़ेएऩ वाघ या चार विस्तार अधिका:यांची विभागीय चौकशी होणार आह़े
ग्रामपंचायत करणार वसुली
या चार विस्तार अधिका:यांच्या अखत्यारित असलेल्या ग्रामसेवकांकडे सुमारे अडीच ते तीन कोटींची वसुली होणे आवश्यक होत़े आतार्पयत संबंधित ग्रामसेवकांकडून फक्त 49 लाखांची वसुली करण्यात आली आह़े

Web Title: Four Expansion Officers: Inquiry