थाळनेर पोलिसांकडून साडेचार लाखांचा दारू साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:03+5:302021-01-16T04:40:03+5:30

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने १४ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना ...

Four and a half lakh liquor stocks seized from Thalner police | थाळनेर पोलिसांकडून साडेचार लाखांचा दारू साठा जप्त

थाळनेर पोलिसांकडून साडेचार लाखांचा दारू साठा जप्त

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने १४ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना एका कारमध्ये दारूचा अवैध साठा नेला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ लगत असलेल्या शिरपूर तालुक्यातील पिंप्री फाट्याजवळ थाळनेर पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळेस कार (क्र. जीजे ०५ सीएफ ४४७०) आल्यानंतर ती थांबविण्यात आली. कारची तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचे ५० बॉक्स आढळून आले़ पोलिसांनी वाहनासह दारू साठा ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या दारू साठ्याची किंमत ३ लाख १२ हजार रुपये असून, कार १ लाख ५० हजार रुपयांची आहे. असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने केली.

Web Title: Four and a half lakh liquor stocks seized from Thalner police